The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Monday, March 25, 2024

 “घडिघडी करावा विवेक देहादि प्रपंच मायिकसत्य नित्य शाश्र्वत एक असे   नि:शंक आत्मरूप”


“स्वरूप पत्र मंजुषा” या स्वामींनी साधकांनां लिहिलेल्या पत्र संग्रहांतींल क्र. ६३-६४-६५ ही तीन पत्रे व स्वामींचे संजीवनी गाथेतील अभंग  सोsहं साधने च्या दृष्टीने फार उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.तीनही पत्रांत साक्षित्व शब्द आहे

यांतून स्वामी  विवेक युक्त वैराग्या ची गुरूकिल्लीच साधकांच्या हाती देतात. 


 “घडिघडी करावा विवेक देहादि प्रपंच मायिकसत्य नित्य शाश्र्वत एक असे नि:शंक आत्मरूप”॥स्वपमं.६३/२


आत्म-रूप कसं?ते नि:संदेह सत्य नित्य शाश्र्वत एकमेवाद्वितीय आहे. तर  देहादि प्रपंच मायिक म्हटलं आहे.

मायिक म्हणजे जी सत् नाही असत् ही नाही पण दिसते, भासते व व्यावहारिक सत्तेत आहे अशी प्रातिभासिक नाशिवंत


आता विवेक युक्त वैराग्या चा विचार करु. स्वामींनी लिहिले आहे वैराग्याचा अभ्यास सुखें करावा. विरोधात्मक अशा वाटणाऱ्या या विधानाची खूण ही लगेच सांगतांनां ते लिहितात देहांत गुंतू  नये


प्रपंचीं असावें उदास वर्तन । आवरावें मन विवेकाने ॥१॥ सुखें वैराग्याचा करावा अभ्यास। प्रपंचाचा त्रास मानूं नये ॥३॥स्वामी म्हणे देही जाई गुंतून ।ही चि असे खूणवैराग्याची ॥४॥” मायिकाची आसक्ती सोडा हा मुद्दा स्वामी वारंवार समजावतात “अंतरीं संतत करीं सोsहं ध्यान।न जाईं गुंतून संसारांत॥१ ॥धन सुत दारा असूं दे पसारा।नको देऊं थारा आसक्तीतें॥२॥होवो हानि- लाभ पावो सुख-दु:ख।न सोडी विवेक साक्षित्वाचा ॥३॥स्वामी म्हणे राहें देहीं उदासीन। पाहें रात्रं-दिन आत्म-रूप ॥४॥ “अंतरीं  जागृत ठेवावा विवेक । लक्षूनियां एक आत्म-रूप” ॥संजीवनी गाथा २०३,१५०,१६४/२॥

सांप्रदायिक अनुग्रह लाभलेल्या साधकांनां स्वामी सांगतात :-

“तुजलागीं संप्रदायें करोन ।समंत्र सांगितलें सहज-साधन ।नित्यनेमें आसनीं बैसोन करावें चिंतन स्वरूपाचें

॥१॥  स्व-रूप चिन्मय आनंदघन। आपणहि तैसेचि परिपूर्ण।ऐसें भावितां तन्मय होवोन मनासी मनपण उरे कोठें ?॥२॥उरे कोठें द्वैत-स्थिति।देह-गेह-

जगत्-भ्रांति।क्षणैक अद्वयानंदानुभूति। देतसे शांति साधकाासी॥३॥ साधकासी पुनरपि भव-प्रत्यय।होतां नाना वृत्तींचा उदयसोsहं-स्मरणें धरावी सोय नित्यानित्य-विवेकाची॥४

विवेकाचा घेवोनि आधार साक्षित्वें करावे सर्वहि व्यापार।सुख-दु:खे प्रारब्धानुसार भोगावी साचार यथाप्राप्त॥५॥ प्राप्तकर्माचरणीं निपुण। भक्ति-ज्ञानें सुसंपन्न ।अखंड करी सोsहं-ध्यान ।कृतार्थ जीवन होय त्याचे”॥६॥स्व.प.मं. ६५॥ या पत्रात

स्वामी नित्यानित्य विवेक सांगत आहेत.


जीव,जगत्,ईश्र्वर व अनिर्वचनीय ब्रह्म यांचा अन्योन्य संबंध समजून आपणही आत्मानात्म, सत्यासत्य, नित्यानित्य, विवेक करून होळीपौर्णिमेच्या पर्वी लेखाची सांगता मानस होळीने करूंया 

         

        संत जनाबाई यांची

        ।। मानसहोळी ।।

 कराया साजरा । होलिकेचा सण । मनाचे स्थान । निवडीले ।।ऐसे ते स्थान । साधने सारविलेभक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।। रचलीया तेथे। लाकडे वासनांचीइंद्रीयगोवऱ्यांची। रास भली ।। गुरुकृपा तैलरामनाम घृत ।अर्पिले तयात । ऐसे केले ।। रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । यज्ञरूप आले । झाली कृपा ।।दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।आणिक पुर्णाहूतीषड्रिपु श्रीफळ।।झाले सर्व हुतवैराग्य अग्नीत । जाणावया तेथ । नूरले काही ।। वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।।जेणे मुक्तीची दिवाळी।    अखंडित ।। 


सोsहं-हंसावतार चैतन्यरूप स्वामी स्वरूपानंद यांचे चरणी ही शब्दसुमनें    

             सर्वभावे समर्पण

               माधव रानडे


    होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎉🎊❤🧡💛💚💙💜🖤🤍








No comments: