Tuesday, February 27, 2024

 २७ फेब्रु. २०२४   “आत्मा जेणें हस्तगत रत्न होय


सद्गुरू स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांनीं ज्ञानेश्र्वरीतील निवडक १०८ ओव्यांची जपमाळ ज्ञानेश्र्वरी नित्यपाठ केली. त्यांत क्र.१०४ वर ज्ञानेश्र्वरी १८/१३२३ 

हें गीतानाम विख्यात सर्व वाड्मयाचें मथित आत्मा जेणें हस्तगत रत्न होय ही ओवी येते.

अर्थ अगदी सोपा आहे, की गीताया नांवानें विश्र्वविख्यात हा ग्रंथ सर्व वाड्मयाचें  सार आहे. तद्वतच,

ज्ञानेश्र्वरी नित्यपाठहे भावार्थ दीपिका चे म्हणजेच ज्ञानेश्र्वरी चे सार आहे असे स्वत: स्वामींनी लिहिलें आहे.

याठिकाणी मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत (१) स्वामींनी  ज्ञानेश्र्वरी  नित्यपाठया संकलनात ज्ञानेश्र्वरी तील ओव्यांचा क्रम बदलला आहे (२)अध्याय १४ व १५ मधील एक ही ओवी या संकलनात नाही (३) तरीही स्वामींनी गीता तत्व-विचार सुसंबद्ध, स्पष्ट पण सार रुपाने मांडलाय. (४)

ज्ञानेश्र्वरी नित्यपाठचा महाराष्ट्रात अनेक घरात नियमीत पाठ होतो आणि यातील बहुसंख्य ज्ञानेश्र्वरी कडे आकृष्ट झाले. स्वामींनी लिहिलंय :- बाल्यापासुनि  गीताध्ययनीं होता मज बहु छंदतारुण्यीं तत्कथित-तत्व-सुख भोगीं आज अगाध” ॥अमृतधारा १३९ 

ही साकी स्वामींनी १५/२/१९३५ ला लिहिली व तेंच गीता-तत्व-सुख पुढे त्यांनी ज्ञानेश्र्वरी नित्यपाठच्या रूपे संकलीत केले आणि ही मोक्षरूपी संपत्ति समाजात मुक्तहस्ते वाटली.

गीता-तत्वाचा मुख्य बोध हा आहे की, आत्म-रूप मी देहापुरताच मर्यादित, सीमीत, नाही तर अमर्याद व व्यापक म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी खरा मी अज, अमर, आहे त्या आत्म-रूपात तद्रूप व्हावे तदाकार व्हावे. ते स्वानुभव सांगतात:-

“हरि-रूप ध्याता हरि-नाम गातां ।हरि चि तत्वतां झालों आम्ही ॥१॥ आत्म-रूप आतां आघवा संसार । ठेली येरझार एकसरां ॥२॥पावलों नैष्कर्म्य देहीं विदेहत्व  डोळां पर-तत्व देखियेलें ॥३॥वा “ आता काय मज संन्यासाचें काज । निजांतरीं गुज प्रकटलें॥१॥प्रकटता घडे सहज-

संन्यास नैष्कर्म्य-पदास गांठियेलें ॥२॥ करोनि अकर्ता भोगोनि अभोक्ता ॥३॥ विश्र्वीं आत्म-सत्ता नांदतसे ॥४॥ संजीवनी गाथा अभंग क्र.२० व ५१॥ कारण 

सोsहं-भाव-प्रचीत येतां सहज- संयमी झाला । आत्म-रूप जगीं एक संचलें हा दृढ निश्र्चय केला ॥ अन्यथा

“अहंकार जो मन-बुद्धीचा घेऊनियां आधार । जीवा भुलवी सदा दाखवी जन्म-मरण-संसार ॥भावार्थ गीता १२/४७ व २६ ॥

ज्ञानेश्र्वर माऊलीं नी विश्र्वविख्यात गीते वर प्राकृतात ज्ञानेश्र्वरी चा अद्वितीय अलंकार राजमुकुट चढवून “तीरें संस्कृताची गहनें । तोडोनि मऱ्हाटिया शब्दसोपानें । - - -॥ज्ञानेश्र्वरी ११/९ माय मऱ्हाठीला महाराणी  पट्टराणी बनविले देशियेचे लावण्य अजरामर केले. मराठी ला राजतिलकाने श्रीमंत केले. माऊलींच्या मांदियाळीतील  अठरापगड समकालीन संतकवींनी या राजकोषात भाव बळावर मोलाची भर घातली. माऊली सांगतात-

“तीर्थ व्रत नेम भावेंवीण सिद्धी।

वायांचि उपाधि करिसी जना॥१॥ भावबळें आकळें येऱ्हवीं नाकळें ।

करतळीं आंवळे तैसा हरी ॥२॥

पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।दिधलें संपूर्ण माझ्या हातीं॥४॥हरिपाठ १२॥

आपल्या सुदैवानें स्वामींनी माऊलींचे ज्ञानेश्र्वरी, अनुभवामृत, चांगदेव 

पासष्ठी हे तीनही प्रमुख ग्रंथ अभंग रूपात तसेच गीता सोप्या प्रचलीत मराठीत साकी वृत्तात लिहून निर्गुण  परमात्मा हस्तगत रत्न होय असे केलें आहे. मराठी भाषा समृद्ध केली आहे.

आज जागतिक मराठी भाषा दिवस

त्या निमित्ताने आपण ज्ञानेश्र्वर माऊली आणि त्यांना साक्षात भगवान विष्णु: मानणाऱ्या चैतन्यरूप सोsहं-

हंसावतार सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांना मानाचा मुजरा.

त्यांच्या कृपाप्रसादाने स्फुरलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणीं सर्वभावे समर्पण.

माधव रानडे


Friday, February 16, 2024

                       संसार तो झाला मोक्ष-मय



गुरुमाऊलींनी मायेच्या ममतेने अंगाईगीता सारख्या   गोड शब्दांत आपल्याला सांगितलंय:-



“करीं च काहीं त्वरा जोंवरी जरा-मरण तें दूर जरा न नजरानजर जाहली तोंच पालटे नूर ॥जोंवरी न ती कानीं आली काळाची आरोळी। मोह जाळुनी होई मोकळा कर वाजवुनी टाळी॥ असे सहज परी सोsहं भावें करी सतत अभ्यास । हीच साधना जोंवरी न तो झाला मोह निरास” ॥अमृतधारा सा. ९१-९२-२५॥

जरा हा शब्द प्रथम वृद्धावस्था तर नंतर क्षणिक या अर्थाने योजिला आहे. वृद्धावस्थेत अंथरुणाला खिळून रहावं लागलं तरी खिन्न वा उदास होऊं नये म्हणून सद्गुरु वेळीच सावध व्हायला सांगत आहेत. पुढे ९२ व २५ मधे मोह नष्ट करण्यासाठी स्वामी सोपी साधना म्हणून सतत सोsहं भावात राहायला, सोsहं चं अनुसंधान ठेवायला सांगतात.स्वामी पुढे सांगतात “अन्तरांतुनी सहज ध्वनि तो निघतो सोsहं  सोsहंविनाश्रवण ऐकतां तोषतो माझाआत्माराम”॥अधा.१४७ स्वामी स्पष्ट संकेत देतात की  सोsहं हा अन्तरांतील ध्वनि आहे व तो विनाश्रवण, मनाच्या कानांनी,सर्वांगाचे कान करुन ऐकायचा आहे. चिंतना साठी घेतलेल्या अभंगात स्वामी सांगतात -

कृपावंत भला सद्गुरु लाभला ! अंगीकार केला तेणें माझा ॥१॥अंतरींची खूण दाखवोनी मज।सोsहं मंत्र गुज सांगितलें ॥२॥ ठायीं चि लागली अखंड समाधि।संपली उपाधि अविद्येची ॥३॥ स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला।संसार तो झालामोक्ष-मय॥४॥संगा१७ 

इथे लक्षात ठेवलं पाहिजे कीं हा स्वामींचा स्वानुभव आहे व आपल्याला तसा अनुभव हवा  तर स्वामींनीं सांगितलेलं सहज साधन नित्य-नेमाने केले पाहिजे. पण आपण छोट्याछोट्या मोहात पडतो. “गीताई” चे  लेखक आचार्य विनोबा भावे यांचा गीता व्यासंग सर्वश्रुत आहे. मोक्ष संकल्पनेवरील त्यांचं उत्तर अत्यंत समर्पक व उद्बोधक आहे मोहाचा क्षण टाळणे हाच मोक्ष


चर्पटपन्जरिकास्तोत्रम् च्या सहाव्या चरणात आदि शंकराचार्य लिहितात- “अंगं गलितं पलितं मुण्डं । दशनविहीनं जातं तुण्डम् । वृद्धो याति गृह्वीत्वा दण्डं । तदपि न मुंच्तत्याशा पिण्डम् । भज गोविंदम् भज गोविंदम् मूढमते मूढमते ”॥६॥ अशाच आशयचा ज्ञाने.९/५१४वर आधारित स्वामींचा अभंगः- “जरी तो दर्दुर सर्पमुखीं गेला । तरी आस त्याला मासियेची॥१॥तैसी प्राणियांसी सोडवे तृष्णालागलीसे प्राणा तांत जरी ॥२॥  घडी घडी काळ भक्षितो आयुष्य। परी ह्याचें लक्ष प्रपंचांत ॥३॥ स्वामी म्हणे जीवा होई गा सावधघेई वेगें वेध माधवाचा ”॥४॥सं. गाथा २०८ 

स्वामी भक्ती व स्वरूपानुसंधानाने, जीव ब्रह्मैक्य साधायला सांगतात-

सर्वव्यापी सदा स्वरूपीं ठेवुनियां अनुसंधानमन:कल्पना जाळुनि नाना, करीं असें मद् - यजनवंदन भावें तसें करावें मजसी सर्वांठायींअभेद चित्तें मज एकातें जाणुनि सर्वां देहींजीवात्म्याचा परमात्म्याशीं साधुनियां संयोग । असाचि मत्पर तूंहि निरंतर मत्प्राप्ति-सुखा भोग ! ॥भावार्थ गीता९/१३०,१३१,१३२ ॥ 


अभेद चित्तें मज एकातें जाणुनि सर्वां देहीं  असाचि मत्पर तूंहि निरंतर मत्प्राप्ति-सुखा भोग


आणि या सुखाचा अनुभव आला की मग - 

“स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला। संसार तो झाला मोक्ष-मय” ही अवस्था आपसुकच   प्राप्त  होते. 


प्रेरणास्रोत सोsहं-हंसावतार चैतन्यरूप स्वामींच्या चरणीं ही शब्द-सुमनें सर्वभावें समर्पण. 

माधव रानडे