The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Monday, October 28, 2019

             “ सोऽहं-हंसोपनिषद
                        अर्थात 
           श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) 
                 यांच्या साहित्यातील
                  ( चाकोरीबाहेरचे )
              मराठीतील पहिले उपनिषद
                    ( क्रमश :-२०) 
‘अनंत ब्रह्मांडें सांठविसी पोटीं।तो तूं भक्तिसाठीं विकलासी॥’
स्वामी म्हणे देवा तूं चि विश्वंभर।भक्तांचा चाकर स्वयें होसी॥

आज विजयादशमीच्या सुमुहुर्तावर ०८ ॲाक्टो. १९ ला ब्लाॅगवर नवीन लेखाला प्रारंभ करतांना अनेक कारणांनी आनंद होत आहे. 

त्यातील महत्वाचं हे की स्वामींच्या कृपाशिर्वादाने माझा पुनर्जन्म झालाय. त्याबद्दलच लिहिणार आहे या लेखात. हो, याला पुनर्जन्मच म्हणावा लागेल. 

कारण ०२ जुलैला पहाटे मला घरात हृदयविकारचा मोठा झटका येऊनही जवळच्या हाॅस्पिटलमधे पोचू शकणं. तिथेच दुसऱ्यांदा छातीत तीव्र वेदना / कळा आल्यावर प्राण वाचविण्यासाठी लगेच रक्त पातळ करणारं इंजेक्शन दिलं जाणं, पुढील उपचारासाठी, रुबी हाॅलला रवानगी साऱ्या घटना नाट्यमय रीतीने, विनासायास घडल्या. एव्हढंच नाही तर सुट्टी घेऊन, लगेचच पुण्याला निघालेल्या लष्करातील माझ्या उच्च पदस्थ मुलाला दिल्ली विमानतळावर डाॅ. विनयाचा अकल्पित फोन, त्यांच्यातील संवादामुळे प्रिय श्री बाबुराव यांना मी रुबीत असल्याचे कळून त्यांचे श्री स्वामींच्या खोलीतील अंगारा प्रसाद घेऊन शस्रक्रियेच्या आधी रुबीला येणे, परत  ७ जुलैला मृणालिनीताई जोशी, (ती.दीदीचा) पुढील निरोप घेऊन येणं - ( “ अप्पा असती सदा सांगाती । प्रगटतील शस्रधारका हातीं । तेच लक्षतील आपुले हित । आपण असावें स्वस्थचित्त । दिदी म्हणे बा माधवा । दुजे काय सांगू मी तुला । आशिर्वाद ”।) डाॅ.स्वप्नील कर्णे या निष्णात Cardiothoracic Surgeon (CVTS -Topper Gold Medalist) यांना माझी शस्रक्रिया सोपवली जाणं, ते डाॅ.विनया चितळे या नाक, कान घसा तज्ञ आणि अमेरिकन बोर्ड मान्यता-प्राप्त, व दोन्ही देशात सारखीच प्रॅक्टीस करणाऱ्या, टिळक रोड वरील चितळे हाॅस्पिटलच्या सर्वेसर्वा, माझ्या भाचीच्याच बॅचचे व चांगले मित्र असणं सारं काहीं सकृद्दर्शनी/वरकरणी अनाकलनीय पण सतत मला श्रीस्वामींच्या पुढील अभंगाची आठवण करवणारं.

“ आड येतां विघ्न सोडी सुदर्शन । भक्तां नारायण सांभाळितो ॥१॥ स्वामी म्हणे होई दासाचा हि दास। येई नाना वेष धरोनियां ॥२५३/४॥सं.गाथा.

डाॅ.अभय बंग यांच्या“ माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकाची आठवण यावेळी मला झाली. फरक हा माझा हृदयरोग साक्षित्व साक्षात्कारीवाटला

कारण या सर्व घटना घडत असतांना मी कमालीचा शांत होतो पत्नी व सुनेला धीर देत होतो. चैतन्यरुप स्वामी या घटना साक्षित्वाने पहाण्याची शिकवण यातून मला देतयाची जाणीव अंतरात सतत होत होती. परमात्म्याप्रमाणेच ब्रह्म-लीन श्रीस्वामींचे संवादाचे माध्यम देखील घटनांचच असणार ना ?

श्रीस्वामींच्या स्वरूप पत्र मंजुषा मधील पत्र क्र. ६३-६४-६५ या तीनही मधे  “ साक्षित्व ” हा शब्द येतो यावर लेख लिहितांना माझा गृहपाठ स्वामींनी करून घेतला होता. आता त्यांनां वाटलं असावं कीं  “ पुरे पुस्तकी विद्या ती की अवघी पोपट-पंची ।”
माझा हा अनुभव, व त्यातून मी घेतलेला बोध/अर्थ पूर्णपणे वैयक्तिक आहे.

 “ आत्मरुपीं दृढ विश्वास । आत्माचि मी हा निदिध्यास।साक्षित्वें  साहोनि सुख-दु:खास । करावा अभ्यास नित्यनेमें ”॥६३/३॥ “नाना वृत्तींचें स्फुरण । अंतरीं होतसे कोठून साक्षित्वें पहावें  आपुलें आपण ।अति अलिप्तपण ठेवोनिया ”॥६४/२॥ “ विवेकाचा घेवोनि आधार । साक्षित्वें करावे सर्वहि व्यापार । सुख-दु:खें प्रारब्धानुसार।भोगावीं साचार यथाप्राप्त”॥६५/५

यातून श्रीस्वामी समजावतात, कीं देह म्हटला, कीं  प्रारब्धानुसार सुख-दु:ख ही येणारच.येतील तशी तीं भोगणं त्यांचा स्वीकार तटस्थ /त्रयस्थ वृत्तीनं करणं, म्हणजे साक्षित्व. कोर्टातील केसमधे जो साक्षीदार असतो, त्याला त्या घटनेबद्दल काही सुख-दु:ख नसतं. त्याने काय पाहिलं ते तो त्रयस्थ पणे सांगतो. साक्ष देतो “ “ सोऽहं च्या अभ्यासाने, “ सुखी संतोषा यावे दु:खी विषादा भजावे । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजी ”॥ ही वृत्ती जसजशी अंगीं बाणूं लागेल, तसतशी “ सोऽहं ” भजनातील तन्मयता वाढून तीच साधना सोऽहं-भाव साक्षीत्व बनेल. ‘‘सोऽहं’’ साधना, साधकाला आत्म-रूपाची, स्वरूपाची ओळख करून देते. देहाहून, मनाहून, बुद्धीहून मी निराळा आहे. हे आपले स्वरूप आपण ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे. देहाचे, मनाचे, बुद्धीचे व्यवहार साक्षित्वाने पाहता आले पाहिजेत. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये आपण सतत देहच केंद्रस्थानी ठेवल्यामुळे देहच मी अशी “ देह-बुद्धी बळावते. एकदा खरा ‘ मी ’ कोण ह्याचा निश्चय झाला कीं, तीच “देह-बुद्धी”आत्म-बुध्दी होते. 

स्वामींच्या साहित्यातून प्रकट होणारं “सोऽहं-भाव, सोऽहं-स्मरण, सोऽहं-ध्वनि अनुसंधान यावर भर देणारं मराठीतील हे  “ सोऽहं-हंसोपनिषद ”, असं चाकोरीबाहेरचे योगदान आहे. कालाची पावलं ओळखून, भक्ती आणि नामस्मरण यावर भर देणारं, दृष्टया स्वामींचं पुढील पिढ्यांसाठीं काव्यात्मक लेणं/वरदान आहे. 
वयोपरत्वे (८०+) व ८ जुलै रोजी हृदयाच्या मोठ्या शस्र-क्रिये नंतर उद्भवणाऱ्या असंख्य अडचणींतून मार्ग काढून विजयादशमीला गुंफण्यास सुरु केलेली ही शब्दसुमनं निदान पाडव्याला श्रीसद्गुरुचरणीं अर्पण करावी ही इच्छा त्यांच्याच कृपेनं पार पडली.

या पुनर्जन्मामुळे हाही विश्वास वाढला की त्यांच्या कृपेनं होणारी अल्प-स्वल्प सेवा त्यांना मंजूर आहे.

ranadesuresh@gmail.com         माधव रानडे.

                                                
The links to the YouTube videos and blog on the life, literature, & philosophy of Swami Swaroopanand (Pawas) produced/financed/dreamt by me are given below.

(1) The Art of Happy Living सुखी 
जीवनाची कला
          https://youtu.be/rXoNczKaaio

(2) दृष्टि Vision
          https://youtu.be/MJuh4xx4Vus

(3) Blog Address -  
          www.swamimhane.blogspot.com

No comments: