The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Sunday, May 19, 2019

               
सोऽहं-हंसोपनिषद
                   अर्थात

                 ( क्रमश :-१७ )             
            श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
                यांच्या साहित्यातील
                ( चाकोरीबाहेरचे )
            मराठीतील पहिले उपनिषद            
           “ एक तत्व नाम दृढ धरी मना

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठा बद्दल माहिती नाही असा मराठी वाचक विरळा असेल. त्याच हरिपाठात, वरील अभंग २६ मधे, दोनदा नामाचा तत्व असा उल्लेख येतो. तत्व अविनाशी असतं.

ॐ’ काररूपी स्फुरणाने परमात्म्याला शक्ति-तत्वाचं स्वरूपदर्शन झालं.ते नामाच्या रूपे संत-मुखांतून सबीज होत विश्वबांधवानां प्राप्त होतं

नामही अविनाशी आहे. जीव आणि शिव यांनां जोडणारं नाम हा जीवब्रह्मैक्या साठीचा दुवा, द्वैतातून अद्वैताकडे नेणारा पूल, सांधा आहे.

नाथपंथातील, नामाची पार्श्वभूमी थोडी अशी अाहे . श्रीगहिनीनाथांनीं संप्रदायातील रुक्षपणा भक्तीनामाच्या गोडीनं कमी केला. ते कृष्ण नामी रंगलेले महाराष्ट्रीयन होते. त्यांनीं निवृत्तीनां  तीच उपासना दिली. श्रीनिवृत्तीनाथांनी अनुग्रहाचे वेळीं माऊलींनां हरिनाम दिलं. अखंड नामस्मरण केल्यामुळे श्राज्ञानदेवांनां भगवंताचे दर्शन झालं
माऊलींच्या  स्वानुभवाचं, स्वानंदाचं, काव्यात्मक शब्दलेणं म्हणजे हरिपाठ

उत्तर वैदिककालीन विचारात स्वरुप साक्षात्कार अपरोक्ष अनुभव हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आणि स्वरुपानुसंधान,अद्वैत वेदांताचं अधिष्ठान झालं. त्यासाठी श्रवण-मनन, निदिध्यासन मार्ग श्रुतींनी दाखविला. यातून ईश्वरी-कल्पना भक्ती आणि श्रद्धेचे अनुसार वेगवेगळ्या देव-देवतांचे भजन-पूजन, नाम-संकीर्तन यांचा उदय झाला.

इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की भारतीय धर्मदृष्टी ही सर्वसमावेशक व सहिष्णु आहे. अंतर्यामी, अद्वितीय, सर्वात्मक ईश्वराची देवतात्मक अनंत नामरूपे भलेही असोत पण या सर्वांचे अधिष्ठान आत्मसत्ता, आत्म-रुप आहे ही वास्तव भूमिका आहे. त्यात सांप्रदायिक कलह/अभिनिवेशाला स्थान नाही. याबाबतीत ऋषींचे प्रज्ञान व साक्षात्कारी संतांचे खालील वैचारिक बैठकीमुळे, एकमत आहे.

“ आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागर । सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छती ”॥ अर्थात्

आकाशातून पडलेले पाणी जसे सागरात जाऊन मिळते, तद्वतच कोणात्याही देवाला केलेला नमस्कार केशवालाच पोचतो.

असाच प्रकार नामाच्या बाबतीतही आहे. आणि हे मत आहे माऊलींच्या हरिपाठाचे सखोल सार्थ विवरण-कर्ता तत्वज्ञानाचे प्रा.के.वि.बेलसरे यांचं
त्यांनी लिहिलं आहे-“ भगवंताच्या नामांत ज्याचे अंतरंग रमू लागते त्याचे अंत:करण शुद्ध म्हणजे सूक्ष्म होत जाते. शुद्ध अंत:करण व्यापक बनते. व्यापकपणाने साध्य व साधन ( म्हणजे भगवंत व त्याचे नाम ) यामधील अंतर कमी होत जाते. अखेर नामाला इतकी सूक्ष्मता येते, की नाम आणि भगवंत या दोघांमधे फरक दाखवणे अशक्य होते. तसेच नाम घेणारा जो मी तो एक नामरूप तरी होतो किंवा भगवद्रूप होऊन सोऽहं म्हणू लागतो.”
ही गोष्ट सर्वविदीत आहे, की शीख, ख्रिश्चन, इस्लाम बांधवही नामस्मरण करतात.             
श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) यांचे साहित्यात   सोऽहं-हंसोपनिषदचाकोरीबाहेरचे मराठी तील पहिले उपनिषद प्रतीत होण्याचं कारण कीं त्यांनी कालानुरुप बदल करुन नाम व भक्तीच्या पायावर ‘सोऽहंचा सोपा मार्ग विश्वाला दिला.
स्वामींची वर-प्रार्थना, केवळ आठ चरणांत अष्टांग योगासारखी द्वैतातून अद्वैताकडे जाणारा एक परिपूर्ण असा साधना मार्ग शिकवते. म्हणून त्यातील एक कडवे (६) सोऽहं-हंसोपनिषदाचा शांतिपाठ म्हणून निवडले.

स्व.प.मं. तील ६/१२ मधे श्रीस्वामीनी लिहिलंय
“ असो; संसार व्हावया मोक्षमय। सांगतो अति सुगम उपाय । भावार्थ गीतेचा द्वादशाध्याय । होऊनि तन्मय वाचावा ॥ ४२/७ या पत्रांतही अ.१२ पठण करा लिहिलंय.
भगवंत भक्तांबद्दल असं सांगतात-

निज-नामाची नौका साची । त्यांत बसवुनी त्यांतें । जन्म-मृत्यु-भव-सागरांतुनी नेईं पैलतिरातें ”॥भा.गीता १२/२५॥

आधींच्या लेखांत उल्लेख केला तसा स्वामींनी“ ॐ रामकृष्ण हरि ” हा मंत्र समाधीपूर्वी स्वत: सांगून सबीज केला व करवून घेतला. त्यांनी हा नामाचा वसा आमचे मामा वै.भाऊराव देसाईंना दिला. त्यांनीं १००१ कोटी जपाचा संकल्प केला (स्वामी कृपांकित कर्मयोगी भाऊ पृष्ठ १९-१०७)
नामजपात आमच्या आईचे मोठे योगदान आहे.

कोटीच्या कोटी आवर्तने झालेल्या या जपाने व आजतागायत ३६५ दिवस श्रीक्षेत्र पांवसला होत असलेल्या या नाम-मंत्राला आता क्षेपणास्त्राची गती आली आहे. आपण ज्या वाहानात बसतो तीच गती आपल्याला मिळते हा साधा विज्ञानाचा नियम.

मध्यंतरी एकदा माझे आवडते कलाकार श्री प्रशांत दामले यांना दूरदर्शन वर गातांना ऐकलं-
मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !

तेंव्हा सहज मनांत आलं, याचं सोपं उत्तर आहे-

बैसोनि घरात । करा एकचित्त । आळवा हा फक्त । नाम-मंत्र ॥

श्रीस्वामींनी आपल्याला दिलेल्या नामाच्या या  क्षेपणास्त्रात बसून घर बसल्या काय सुख मिळतं, पहा तर खरं. नाहीतर, असं करा कीं-
“ The Art of Happy Living सुखी जीवनाची कला ” हा YouTube video पहा आणि श्रीक्षेत्र सहलीबरोबरच श्रीस्वामींच्या समाधी मंदिरात चाललेल्या नाम-मंत्राचा आनंद घ्या.
आज नारदजयंतीच्या शुभमुहूर्तावर या लेख-मालेतील हे पुष्प प्रेरणास्रोत सद्गुरूचरणीं समर्पण.

सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
                                              माधव रानडे
ranadesuresh@gmail.com        

Tuesday, May 7, 2019

              
सोऽहं-हंसोपनिषद
                        अर्थात
           श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
               यांच्या साहित्यातील
                ( चाकोरीबाहेरचे )
            मराठीतील पहिले उपनिषद
                  ( क्रमश :-१६ )

     “ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती

श्रीज्ञानेश्वरीच्या सातवा अध्याय, ज्ञान-विज्ञान योगावरील ओव्यांत माऊली सांगतात, हजारो लोकांत एखादाच, ज्ञान प्राप्तीची तीव्र इच्छा मनांत धरून त्यासाठी यत्नशील असतो.त्यापैकीं क्वचितच कुणी पूर्ण ज्ञानी होतो. (ज्ञाने.७/१०)
शेकडों जन्मांचा सत्संग, सन्मार्ग,फलाशे शिवाय केलेले सत्कर्म, व गुरुकृपेनं ज्ञानी भक्त ब्रह्मैक्य ऐश्वर्य अनुभवतो. (ज्ञाने.७/१२८-१३१) आणि-

“ मग ज्ञानरूप । होवोनि आपण । स्वभावें स्वाधीनकरी विश्वसंपूर्ण हें विश्ववासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ॥ म्हणोनि तो ज्ञानीभक्तांमाजीं राजा । जाण कपिध्वजा । निश्चयेसीं ॥ प्रतीति-भांडारीं । जयाच्या साचार । विश्व चराचर । साठवलें ॥ ऐसा तो महंतश्रेष्ठ ज्ञानी भक्तदुर्लभ बहुत। धनुर्धरा ”॥अभंग ज्ञाने.७/२६५-२६८॥आणि (श्रीमद्भगवतगीता श्लोक ७/३ व १९)

सद्गुरू श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) हे अशा अति दुर्मिळ श्रेणीतील, वासुदेवमय, झालेले विसाव्या शतकांतले साक्षात्कारी ज्ञानी भक्त.
स्वामींच्या स्वप्रतीतीचे अभंग याची साक्ष देतात.

एक वासुदेव नांदे चराचरींत्याविण दुसरी वस्तु नाही ॥ध्याता ध्यान ध्येय वासुदेवमय ।एक तो अद्वय स्वामी म्हणे ॥” “ वासुदेवाविण विश्वीं नाहीं दुजेनांदतो सहजें एकला चि । आत्मा बुद्धि मन इंद्रियें विषयवासुदेवमय स्वामी म्हणे ” ॥सं.गा.१५१-१४८ असे भक्त-

स्वयें विश्व-रूप होउनी आपण । साधिती कल्याण जगताचेंमोक्ष-रूप हातीं घेउनी संपत्तिजनालागीं देती भक्ति-पंथें ”॥
      ( संजीवनी गाथा १३/२-३ )

“ जगीं जन्मुनी अभिनव-जीवन-बागवान होईन । स्वानुभव-सुधा शिंपुनि वसुधा नंदनवन बनवीन ”॥अमृतधारा/६॥

या विश्व-कल्याणाच्या भावनेतून, आध्यात्मिक मार्गात प्रगति करू इच्छिणाऱ्या, साधक विश्व- बांधवांनां मार्गदर्शन करण्याच्या हेतूनें, स्वामींनीं “अभंग-ज्ञानेश्वरी”() व स्वतंत्र साहित्य लिहून वाग्यज्ञ केला, तर सांगता वर-प्रार्थनेने केली.

म्हणून त्यातील साकी “ सोऽहं-हंसोपनिषद ” चा शांतिपाठ म्हणून निवडली, शिवाय त्यांत नाथ- संप्रदायाच्या, “सोऽहं-साधनेच्याखुणा आहेत.
“ स्वामी म्हणे माझा नाथ-संप्रदायअवघें हरिमय योग-बळें ” ॥सं.गा.१२२/४॥

नर नारी हरीरूप दिसो बाहेर-अंतरीं

आपला संबंध येतो ते नर नारी अंतरींबाहेर हरीरूप दिसणं,तसा भाव आणि वर्तन असणे ही
अवघें हरिमय वाटण्या पूर्वची अवस्था होय.

“ ॐरामकृष्ण हरी ” हा नाथ-संप्रदाय चा मंत्र. वैखरीवाटे याचा अखंड उच्चार व्यक्तीला स्वरुप -साक्षात्कार घडवूं शकतो. ३० जुलै १९७४ च्या रात्रीं स्वामींनीं हा मंत्र स्वत: सांगत पहाटेपर्यंत करवून घेतला. “सोऽहं-साधनाकरणारानीं नाम स्मरण आपल्या संप्रदायां बसत नाही असे मानूं नये.भविष्यात सांप्रदायिक अनुग्रह-वंचित कोणी स्वरुप-सुखास मुकुं नये असा व्यापक असावा. (स्वा.स्व.जीवन-२७७ व२८७. सं.गाथा ६८/४)

वर-प्रार्थना (१) साकीत स्व-स्वरूपानुसंधानाचा वर मागतात कारण ही प्रक्रिया हे सार/मर्म आहे
स्व.प.मं. क्र.६४/७ मधे स्वामींनी लिहिलं आहे -

“सदा स्व-रूपानुसंधान।हेचि भक्ति हेंचि ज्ञान
आद्य लेखक मुकुंदराज यांच्या ‘परमामृत’ या मराठीतील पहिल्या ग्रंथापासून तर अलिकडील अनेक संतांनीं याच प्रक्रियेवर भर दिला आहे. श्रीस्वामीनी तर बदलत्या काळाची दखल घेत द्रष्टेपणानं आधीच लिहून ठेवलं आहे कीं-

“चालतां बोलतां । हिंडतां फिरतां । लिहितां वाचितां । खातां जेवितां ।- - -। निजात्मसत्ता । आठवावी ”॥॥किंवा - -अनुसंधानप्रयत्नें करोन असों द्यावें ॥ स्व.प.मं ६३-६४/४ ”॥

वर्तमान काळांत हे सर्व व्यवहार करत असतांना आजची पिढी, भ्रमणध्वनि (Mobile) लीलया हाताळत असते त्यामुळे त्यांना अनुसंधान करणं अवघड न वाटतां प्रयत्न-साध्य वाटेल हे खचित.

स्वामींचं साहित्य, म्हणजे त्यांची वाड्:मय मूर्ति, अध्यात्माची काव्यात्मक सहल, ज्यांत नाम व भक्तीच्या भक्कम पायावर, सोप्या,सरळ, भाषेत सोऽहंसाधना अनुस्युत आहे. गीता अ. १०/९ वरील ओव्यांचे स्वामींचे हे अभंग पहा.

“जाहलें मद्रूप । भक्तांचें तें चित्त । प्राण तो हि तृप्त । मद्रूपीं च ॥ जन्म-मरणाची । विसरले वार्ता । मद्रूपीं रंगतांज्ञानबोधें ”॥अ.ज्ञा.१०/ २३३-३४॥ रंगतां मद्रूपीं । भक्त तृप्त होती । उदंड गर्जती । धन्योद्गारें ॥ सद्गुरु शिष्यासीएकांतीं नेवोन । ॐ काराची खूण । दाखवी जीतो चि उपदेश । मेघांच्या समान । सांगती गर्जोन त्रैलोक्यासी ॥ अंतरींचा राखूं । नेणे मकरंद । पद्म-कळी मुग्ध । उमलतां ॥ मग रायारंकांसर्वांसी समान । देतसे भोजन । सुगंधाचें ॥ तैसे चि ते मातेंवर्णिती विश्वांत । स्वानंद-भरांत । येवोनियां ”॥१०/२४८-५३॥

अक्षय्य-तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या लेख-माले तील हे पुष्प प्रेरणास्रोत सद्गुरूचरणीं समर्पण.

सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
                                        माधव रानडे