“ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
यांच्या साहित्यातील
( चाकोरीबाहेरचे )
मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-२४ )
“ तैसी असे भक्ति।स्वभावें अद्वैतीं।जरी साहे ना ती।क्रिया कांहीं ॥परी हें तों नये
।दावितां बोलोन।स्वानुभवें खूण।कळो येतीं॥ ” *
।दावितां बोलोन।स्वानुभवें खूण।कळो येतीं॥ ” *
“ स्वामी म्हणे - - ” या ब्लाॅग वरील “ अभंग-ज्ञानेश्वरी (य) ”
( एक ईश्वरी संकल्प ) या Friday, August 15, 2014 ला प्रसिद्ध लेखानंतरचे
सर्व लेख “ स्वामी म्हणे - ” याच शीर्षकाखाली एकत्रित संकलित/प्रकाशित
झाल्यावर लेखन सेवा तूर्त तरी बंद.
सर्व लेख “ स्वामी म्हणे - ” याच शीर्षकाखाली एकत्रित संकलित/प्रकाशित
झाल्यावर लेखन सेवा तूर्त तरी बंद.
लेखन प्रपंच्याच्या या वळणावर काही साक्षात्कारी संत कवींच्या साहित्यातील निवडक
लक्षणीय विचार/वचनं उद्धृत करणार आहे कारण त्यांचा व स्वामींच्या श्रुतींच्या सखोल
अभ्यासाचा ठसा, छाप स्वामींच्या “ अमृतधारा ” व पर्यायानं “ सोऽहं-हंसोपनिषद ”
तसेच बाकी साहित्यावर दिसतो. म्हणून त्यात आत्म-सुखाचा सुगंध आहे

पुढील साक्या माझ्या विधानाची पुष्टी करतील. त्यांत श्रीस्वामींनी त्यांचे निज-जीवन-तत्वज्ञान, संप्रदायाची खूण, गुरु-परंपरा,अनुभव स्वाध्याय यांचा उल्लेख केला आहे.
(अ.धारा-१२९-१३०, १३३-१३८)
(अ.धारा-१२९-१३०, १३३-१३८)
पण वर्ण्य विषय “ सोऽहं-हंसोपनिषद ”, म्हणून सारांशानं सांगतो. श्रीगीता, ‘परमामृत’
हा मराठी भाषेतील पहिला मुकंदराजांचा ग्रंथ, माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’, समर्थांचा
‘दासबोध’, तुकाराम महाराजांची ‘गाथा’, सर्व एकच सांगतात कीं अद्वैत आनंदाचं
तत्व-सुख/अनुभव शब्दांनी नाही तर केवळ अद्वय भक्ती, अनन्य भक्तीनेच शक्य
आहे व हे ‘मी’ च्या शोधांत स्वरुपानुसंधानाने, स्वरुप बोध झाल्याने होते

यासाठीच श्रीस्वामी सांप्रदायिक “सोऽहं” चें सहज साधन सांगतात
“ सर्व वाणींमाजीं।सत्याचा उत्कर्ष।नित्य निर्विशेष।नांदे जेथें॥तो मी एकाक्षर।
ॐकार निर्मळ।बोलिला वेल्हाळ।वैकुंठींचा ”॥अभंग ज्ञाने.त पुढे अ.९/४५९-६०
मधे स्वामी नि:संदिग्धपणे सांगतात कीं “प्रणवस्वरूपें।येई प्रत्ययास।पार्था ज्याचा
त्यास।अंतरीं च॥ सर्व यज्ञांमाजीं।तो मी सोऽहंजप-।यज्ञ आपोआप।होय जो का”॥
आपण पहात असलेल्या दैनंदिन विश्वात जे काहीं मूर्त रूपाने व्यक्त होते ते उत्पत्ति-ॐकार निर्मळ।बोलिला वेल्हाळ।वैकुंठींचा ”॥अभंग ज्ञाने.त पुढे अ.९/४५९-६०
मधे स्वामी नि:संदिग्धपणे सांगतात कीं “प्रणवस्वरूपें।येई प्रत्ययास।पार्था ज्याचा
त्यास।अंतरीं च॥ सर्व यज्ञांमाजीं।तो मी सोऽहंजप-।यज्ञ आपोआप।होय जो का”॥
विनाशाच्या काल-चक्रात द्वैतात अडकलेले आहे. या बहिरंगाने मोहित न होता अंतर्मुख
वृत्तीने स्वामी अंतरंगाचा वेध घेत सर्व आविष्कारात असणाऱ्या चिरंतन स्पंदनाशी समरस
होऊ शकले. म्हणूनच त्यानी दिक्कालातीत वैश्विक एकात्मतेचा उद्घोष केला -
“ ऐक मात ही सदैव पाहीं मी दिक्कालातीत।आज ना उद्यां जरि नश्वर हा देह
मिळे मातींत॥मृत्यु पावणें पुन: जन्मणें हा मायेस्तव भास।असें व्यापुनी
अणुअणूंतुनी मींच अखिल जगतास॥१२६-२७
मिळे मातींत॥मृत्यु पावणें पुन: जन्मणें हा मायेस्तव भास।असें व्यापुनी
अणुअणूंतुनी मींच अखिल जगतास॥१२६-२७
“अमृतधारे” तील या व अनेक साक्यांवर औपनिषधिक विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून
येतो. जसे ईशावास्योपनिषदातील
येतो. जसे ईशावास्योपनिषदातील
“ तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुष: सोऽहमस्मि ”
॥ईशा.१६॥ या ऋचेतील उद्घोष इथे उमटला आहे.
॥ईशा.१६॥ या ऋचेतील उद्घोष इथे उमटला आहे.
“सोऽहंसिद्धि लाभतां तया सहज घडे मत्प्राप्ति।परी साधनीं भक्ति -पथाची असे
सुगमता निरुती॥” भावार्थ गीता १२/२१॥
सुगमता निरुती॥” भावार्थ गीता १२/२१॥
“ मद्भक्तीनें यथार्थ जाणे असे केवढा कोण।माझ्या ठायीं विलीन होई मग यथार्थ
जाणून॥अरूप माझें स्वरूप सहजें जाणतें हि तें मीच।जाणुनी असें तो हि
समरसे अखंड मजमाजींच !! तेथ सर्वथा आटे द्रष्टादृश्य-दर्शन त्रिपुटी।नित्य
अक्रिया सर्वत्र तया अखंड माझी भेटी॥” भावार्थ गीता १८/८९-९३,९४॥“
जरी स्वभावें कर्म आघवें करी तरी तो मुक्त।ब्रह्मानुभवें अद्वैतत्वें मुक्त होउनी
भक्त ! ऐशा रीती जी अद्वैतीं भक्ति संभवे पूर्ण। आत्मानुभवी तो चि अनुभवी
अनिर्वाच्य ती खूण !! ॥” भावार्थ गीता १८/९७-९८

“ आत्मानुभवें जग चि आघवें वासुदेव-मय झालें । बहु दुर्लभ तो महंत विश्वीं
विश्व होऊनि खेळे !! ॥” भावार्थ गीता ७/४२ ॥
विश्व होऊनि खेळे !! ॥” भावार्थ गीता ७/४२ ॥
“ तो चि एक भक्त नव्हे जो विभक्त । राहे योग-युक्त अखंडित ।
होउनियां देव करी देव-पूजा जरी तो सायुज्या पातला चि।साधिलें स्व-हित गांठिलें अद्वैत तरी भक्ति-पंथ सोडी चि ना ”॥सं.गा.२०४
सहज सोपे आशयघन शब्द श्री-स्वामींच्या सर्वच साहित्यात “ऋषीणाम्
पुनरादयानां वाचम् अर्थोनुधावति” उक्तीचा प्रत्यय येतो
पुनरादयानां वाचम् अर्थोनुधावति” उक्तीचा प्रत्यय येतो
वरील अभंग वा साक्या किंवा स्वामींचं इतर साहित्य परमार्थातील प्रक्रियांचा काव्यात्म
स्वानुभव जणु काही त्यांचं आत्म-वृत्त वाटतं.
स्वानुभव जणु काही त्यांचं आत्म-वृत्त वाटतं.
“ स्वामी म्हणे - - ” या ब्लाॅग/पुस्तकाच्या शीर्षकाचं महत्व/महती कळावी म्हणून
सांगतो कीं “ संजीवनी गाथा ” या स्वामींच्या २६१ अभंग संग्रहातील बव्हंशी अभंगांच्या
शेवटचा चरण अध्यात्मातील, परमार्थ मार्गावरील साधकांसाठी बहुमोल सिद्धांत/वाटाड्या
आहे.
सांगतो कीं “ संजीवनी गाथा ” या स्वामींच्या २६१ अभंग संग्रहातील बव्हंशी अभंगांच्या
शेवटचा चरण अध्यात्मातील, परमार्थ मार्गावरील साधकांसाठी बहुमोल सिद्धांत/वाटाड्या
आहे.
श्रीस्वामीजी काय किंवा नाथ संप्रदायातील इतर सत्पुरुष काय, सर्वांनीच अद्वैतामृतवर्षिणी
गीता आणि त्यातील तत्व सखोल विवरण करणाऱ्या माऊलींचे अद्वितीय टीका भाष्य
“ भावार्थ दीपिका ” अर्थात ज्ञानेश्वरी प्रमाण ग्रंथ मानला यातील साक्षात्कारी संत हे
ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी. “ ज्ञानेश्वरी गौरव ” “अपूर्व नवलाव अनुभवावा ” रचना
हेच दर्शवतात. “ ज्ञानेश्वरी नित्यपाठ ” वाचतांनां मनात येते की श्रीस्वामीजी तर चालती
बोलती ज्ञानेश्वरीच होते. त्यातील भक्ताची किंवा गुणातीताची लक्षणे असोत वा
स्थितप्रज्ञाचं वर्णन या साऱ्यांचे सगुण रुप म्हणजे स्वामी

“ स्वरूप-पत्र-मंजुषा ” या श्रीस्वामींनी सांप्रदायिकांना व सुहृद-सज्जनांना लिहिलेल्या
विस्तृत ६५ओवीबद्ध पत्रांच्या संग्रहाचं संपादन स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी केलं.
त्यांच्या प्रस्तावनेतील काही भाग मी पुढे उद्धृत करीत आहे
विस्तृत ६५ओवीबद्ध पत्रांच्या संग्रहाचं संपादन स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी केलं.
त्यांच्या प्रस्तावनेतील काही भाग मी पुढे उद्धृत करीत आहे
“ हें पत्र-वाड:मय मी आळंदी येथें तन्मयतेनें वाचलें. कोणाही परमार्थ जिज्ञासूला ह्या
पत्रांतून शुद्ध परमार्थातील पुढचा मार्ग उजळून दिसेलच परंतु विषेषत: ज्यांनीं
‘ त्वमेव सर्वं मम देव देव।’ अशा पूर्ण शरणागतीने श्रीस्वामगींच्या चरणीं मस्तक
ठेवले आहे अशा प्रत्येक सांप्रदायिकाला स्वरूप-साक्षात्कार होण्यासाठीच नव्हे तर
कृतार्थ संसारी जीवनासाठीसुद्धां आवश्यक ते सर्व मार्गदर्शन या पत्र-वाड:मयात
मिळेल यांत तिळमात्र शंका नाही. ही पत्र- मंजूषा म्हणजे श्रीगुरूंची खरी खरी
चिरंजीव वाड:मयमूर्ति आहे. ”

आज गुढीपाडवा, १९४२ या नवीन शकाच्या, पहिल्याच दिवशी ही शब्दफुलं
सद्गुरुनां वाहण्याची इच्छा त्यांच्या कृपेनं पूर्ण होत आहे.
सद्गुरुनां वाहण्याची इच्छा त्यांच्या कृपेनं पूर्ण होत आहे.
सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु
श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
Human race is going through very very difficult times due to
Covid- 19 . Many countries, including India have declared lockdown
to arrest this menace
Covid- 19 . Many countries, including India have declared lockdown
to arrest this menace
Let us transform this challenge into an opportunity to look within
/go inside as we can not go outside.
/go inside as we can not go outside.
ranadesuresh@gmail.com माधव रानडे
The links to the YouTube videos and blog on the life, literature, &
philosophy of Swami Swaroopanand (Pawas) produced/financed
under the banner of
philosophy of Swami Swaroopanand (Pawas) produced/financed
under the banner of
“ Swaroop Production ” are -
(1) The Art of Happy Living “ सुखी जीवनाची कला ”
(2) दृष्टि Vision
https://youtu.be/MJuh4xx4Vus
(3) Blog Address -
* २१ फेब्रु.२० क्रमांक २३ च्या लेखात “ अभंग-ज्ञानेश्वरी ” अ.१८ तील शीर्षका खालील व इतरत्र अनेक अभंगांचा संदर्भ दिला आहे.
No comments:
Post a Comment