The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Tuesday, June 18, 2019

             “ सोऽहं-हंसोपनिषद
                      अर्थात
                  
x

           
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
               यांच्या साहित्यातील
                ( चाकोरीबाहेरचे )
            मराठीतील पहिले उपनिषद
(क्रमश:१९)
   अद्वय भक्ति येतां हातीं सरली यातायाती
    
सोऽहं-साधनेचाचरम बिंदु, परमोच्च स्थिती म्हणून “अमृत-धारा” तील साकी १५७ चा, उल्लेख वर केला आहे. अद्वय भक्ति, अद्वैत भक्ति, अभेद भक्ति, त्याला कुठलंही नाव द्या, सारं काही एकच. अर्थातच हे सर्व ज्ञानी भक्तांच्या बाबतीत खरं आहे. शिवो भूत्वा शिवं यजेतअशी भक्ति, ती हीच. अशा भक्तीचा महिमा सांगतांनां श्रीस्वामी लिहितात

मी चि होउनी मातें भजणें शरणागति ही निरुती।
जाण तत्वतां ही स्वभावतां अव्यभिचारी भक्ती ”॥
              (भावार्थ गीता- १८/११९)
होउनियां देव करी देव-पूजाजरी तो सायुज्या पातला चि॥साधिलें स्व-हित गांठिलें अद्वैत।तरी भक्ति-पंथ सोडी चि ना॥” सं.गा.२०४/२-३॥

ज्ञानेश्वर मांऊलींनी पुरस्कार केलेला, स्वानुभव सिद्ध भक्तिप्रधान सोऽहं-साधनेचामार्गच स्वामींनीं  चोखाळला, अनुभवला आणि प्रतिपादन केला.  
एव्हढंच नव्हे, तर वेदान्त आणि भक्ती, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग, एकाच साक्षात्कार दर्शनाच्या दोन बाजू आहेत, असं, त्याच अभंगात शेवटी निक्षून सांगितलं.

   “ भक्त तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त
  जाणावा सिद्धान्त स्वामी म्हणे ॥सं.गा.४०/४॥”

कालानुरूप बदलत माऊलींनी “ भावार्थ दीपीकेत ” नाम भक्ती ह्या गीता तत्वांचं महत्व सविस्तर विशद केलं. तर प्रारंभीच काय सांगितलं पहा-

“ जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतींसोऽहंभावें पारंगतीं।रमिजे जेथ ”॥ज्ञाने.१/५३॥

सोऽहंभावाचं मूर्तिमंत रूप, आत्मतृप्त, श्रीस्वामी, माऊलींच्या पावलांवर पाऊल टाकीत, सांगतात-

सोऽहं-भाव प्रचीत येतां सहज-संयमी झाला।
आत्म-रुप जगिं एक संचलें हा दृढ निश्चय केला ॥ निज-स्वरूपीं असे तोषली सदैव ज्याची वृत्ति
देव-भक्त हा दुजा-भाव हि मुळीं उरला चित्तीं ”॥
           (भावार्थ गीता १२/४७-४६)

श्रीस्वामींचे पुढील पिढ्यांसाठीचे अमूल्य योगदान, त्यांच्या साहित्यातील“सोऽहं-हंसोपनिषद”, सोऽहं-भाव
सोऽहं-स्मरण, सोऽहं-ध्वनि अनुसंधान या त्रिसूत्री वर भर देते. माऊली प्रणीत नामभक्ती या दोन तत्वां पैकीं भक्तीवर आधारित, संतांना प्रिय ही ओवी पहा

“ तरी झडझडोनि वहिला निघ। इये भक्तीचिये वाटे लाग। जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें॥” ज्ञानेश्वरी ९/५१६. याच भावाचे हे अभंग-
“ तरी आतां वेगें। झाडोनियां अंग।नीघ नीघ नीघ।बाहेरी तूं॥भक्ति-पंथा लाग।तेणें चि गा मग।पावसी अव्यंग।रूप माझें॥अ.ज्ञा.९/९७४-७५

गी९/३४ च्या ओव्यांवरील अभंगांत स्वामी सांगतात-

“ सर्वां हि पासून।निज-गुह्य-ज्ञान। पार्था, लपवून ।ठेविलें जें॥ ह्या चि भक्तिपंथेंलाभोनि तें तुज। होशील सहज। सुखरूप ”॥अ.ज्ञा.९/९८२-८३॥

पण आतां यंत्र-युगामुळे बदललेल्या समस्या पहा-

“ बाह्य सुखालागी धांवतो हा जीव।यंत्र युगें हांव वाढविली॥अंतरींच्या सुखा होउनी पारखा।
दु:खाचिया नरकामाजीं पडे॥२२९/१-२॥लोभ अहंकार वाढती अपार।नीति-धर्मा थार नुरे कोठें॥
पाशवी संस्कार घालिती ते पिंगा।गुप्त झाली गंगा मानव्याची ”॥सं.गा.२३०/३-४॥समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया।तरी इमारत यंत्र-
युगाची उठेल मनुजा खाया ”॥“ कां धनिका बेकदर बंगला बांधुनियां नवलाखी। पहा उद्यां जिंकील तुला ती गरिबांचीच हलाखी ”॥ अ.धारा ७७-७८॥

वरील साक्यांमधे यंत्र-युगातील आर्थिक/सामाजिक विषमतेच्या संभाव्य धोक्यांची नुसती जाणीव दृष्ट्या स्वामींनी साधकांना करून दिली नाही तर तोडगाही पुढे दिला. स्वामी नवीन शोधांच्या नाही, तर त्यांच्या अहितकारी वापर-विरोधात आहेत. स्वामी सांगतात-

साधाया कल्याण नाना शोध जाण । लाविती विज्ञान-शास्त्रवेत्ते ॥ अंतरीं सद्भाव असेल जागृततरी यंत्रें हित स्वामी म्हणे ” ॥सं.गा.८१/३-४॥

क्षुल्लक/किरकोळ कारणांनी, बेगडी अहंकारा मुळे होणारे वाद, विकोपाला जात, सूडापोटी
अपराध आणि विकृत मानसिकता फोफावली जाऊन समाज व्यवस्था ढासळत चालली आहे. काही निकृष्ट सिनेमा व टीव्ही मालिका यामुळे याला खतपाणि  मिळतंय. स्व-हितासाठी वेळ कुठे आहे ? याला पायबंद घालायचा तर तसाच सक्षम उपाय हवा.
या लेखाद्वारे मी सर्व सजग, सुजाण वाचकांना सद्भाव जागृतीसाठी, सद्भाव जागृति अभियान सुरु करण्याची नम्र विनंती करीत आहे. पूर्णपणे नि:शुल्क हे अभियान निरपेक्ष मात्र नाही. स्वामींचं विचारधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण निदान दहा नवीन वाचकांपर्यंत पाठवायची प्रामाणिक जबाबदारी आपल्या प्रत्येकाची.

ही शब्दसुमनं प्रेरणास्रोत सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरू श्रीस्वामी स्वरुपानंद महाराज यांचे पावन चरणीं सर्वभावें समर्पण.                                                           माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com
आधींचे लेख खालील संकेत स्थळावर पहावे.
www.swamimhane.blogspot.com
श्रीस्वामींच्या चरित्र, साहित्य व तत्वज्ञानाचा यूट्यूबवरील व्हिडिओ पहाण्यास खालील संकेत स्थळावर पहावा.
https://www.youtube.com/watch?v=rXoNczKaaio&feature=youtu.be



Ashish Shalu said...
मी रानडे सरांना विचारले कि श्लोकांचे विश्लेषण अजून उलगडून करता येईल का? याचे फार छान उत्तर सरांनी दिले. त्यांच्या सांप्रत च्या शारीरिक अवस्था / क्षमतेमुळे त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या ऐवजी मीच ह्या comment मध्ये लिहोतो आहे:
जर सद्भाव असेल तर विमानांचा (यंत्राचा) उपयोग हितासाठी केला जातो नाही तर 9/11 किंवा Disappearance of Malaysian flight MH 370 सारखे भयंकर विनाशकारी प्रसंग पाहायला मिळतात.

S S Ranade said...
Hi आशिष, खरं तर तुझ्या प्रश्नानं, व त्याचं मी दिलेलं उत्तर हे खरंतर तुमच्या मॅनेजेरिअल भाषेत
Value Addition
चं उत्तम उदाहरण होऊं शकेल असं मला वाटतं. मला आणखी एक उत्तम व
सर्वांना समजेल असं म्हणजे मोबाईल चं. आज सर्व वयोगटातील, व आर्थिक गटातील सर्वांच्याकडे
हे यंत्र ( खरंतर राजा विक्रमच्या मानगुटी वरील वेताळ ) आहे ज्यांच्या अंतरांत सद्भाव जागृत असेल
त्या सर्वांसाठी हेच यंत्र हितकारक आहे यांत कोणाच्याही मनांत शंका येऊन शकणार नाही. पण
तोच सद्भाव जागृत नसेल तर जीवघेणे खेळ, ते विकृत मानसिकतेतून उद्भवणारे सर्व धोके संभवतात
हेही सर्वज्ञात / सर्वश्रुत आहे.
म्हणून सर्व वाचकांना नम्र विनंती की या श्रीस्वामींनी सुचवलेल्या या
सद्भाव जागृती अभियाना ची जागतिक चळवळ बनवूंया कारण समर्थांनी सांगून ठेवलंय कीं
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥
इथे तर हे शब्द सोऽहं-हंसावतार ब्रह्म-रूप (सं.गा.१७३/४)) सद्गुरू श्रीस्वामी स्वरुपानंद (पावस)
यांचे आहेत. माधव रानडे.