The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Friday, June 28, 2024

 “माझेनि अनुसंधाने देख।संकल्पु जाळणे नि:शेखमद्याजी चोख।    याचि नांव”॥ज्ञानेश्र्वरी ९/१५७


आळंदीतून निघणारी माऊलींचीदेहूची तुकोबा राय यांची पालखी 

या शुभघडीला ‘अहं’ चा धूप जाळून ‘सोsहं’तेजे ‘स्वरूपा’च्या आरतीचा मानसवारी चा प्रयत्न


निरुपणासाठी ज्ञानेश्र्वरी तील  ९/१५७ ही ओवी घेतली आहे.


श्रीज्ञानेशो भगवान् विष्णु:” या उत्कट भावातून, परात्पर गुरूंशी पराकोटीचे तादात्म्य साधलेल्या, स्वामींनीज्ञानेश्र्वरी नित्यपाठा” च्या रुपाने “भावार्थ दीपिकासारज्ञानेश्र्वरी” तील निवडक ओव्यांचा हार गुंफून आपल्या हाती दिला. श्रीमद्भगवद्गीतेचा व ‘ज्ञानेश्र्वरी’ चा  नववा अध्याय अनेक दृष्टींनी विशेष महत्वाचा व माऊलींना प्रिय. अध्याय १० मध्ये ते सांगतात  “आतां अठरां पर्वी भारतींतें लाभे कृष्णार्जुन वाचोक्तीं। आणि जो अभिप्रावो गीते सातेंशतींतो एकलाचि नवमीं ।।म्हणोनि नवमींचिया अभिप्राया।सहसा मुद्रा लावावयाबिहालो मी वायांगर्व कां करूं ॥हे ऐसे अध्याय गीतेचेपरि अनिर्वाच्यपण नवमाचें तो अनुवादलों हें तुमचेंसामर्थ्य प्रभू ॥१०/३२,३३॥अशा या अनिर्वाच्य व्या अध्यायातील सर्वात जास्त १९ ओव्या स्वामींनी ‘ज्ञानेश्र्वरी नित्यपाठा’ त घेतल्या

संजीवन समाधी वेळीं माऊलींनीं समोर ज्ञानेश्र्वरी ठेवली होती हे नामदेव महाराज- संजीवन समाधी अभंग ६७/७२ मुळे सर्वश्रुत आहे-

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥नदीचिया माशा घातलें माजवण।तैसें जनवन कालवलें ॥२॥दाही दिशा धुंद उदयास्ता विण । तैसेंचि गगन कालवलें ॥३॥जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें  ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवापादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥ तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥ डोळां 

भीममुद्रा निरंजनीं लीनजालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥ नामा  म्हणे आतां लोपला दिनकरबाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥ मी असे ऐकले आहे कीं नववा अध्याय वाचतां वाचतां माऊली  समाधीत गेले, समाधिस्थ झाले.

गीतेच्या नवव्या अध्यायाचे सर्वच ३४ श्र्लोक भगवंतांचे मुखांतील   आहेत ज्यांत त्यांनी जीव-ब्रह्मैक्य योगाचे, परमात्म्याशी एकरूप होण्याचे गुज, वर्म सांगितले आहे

ज्ञानेश्वरी ची भाषा थोडी अवघड असल्याने‘अभंग ज्ञानेश्वरी’ तील स्वामींचे अभंग संदर्भसाठी दिलेत


समूळ संकल्पटाकावा जाळोनमदनुसंधानराखोनियां॥पार्था, हें चि माझें ।निर्मळ यजन ।जेणें होय मननिर्विकल्पसंकल्प विकल्पजातां आपोआप सर्वथा मद्रूपहोसील तूं॥ अर्जुना, हें माझें।अंतरींचें गुज । सांगितलें तुज।आज येथें॥सर्वां हि पासून निज-गुह्य-ज्ञान।पार्था, लपवूनठेविलें जें ॥ह्या चि भक्तिपंथें। लाभोनि तें तुज। होशील सहज। सुख-रूप॥ऐसें बोले भक्तकाम -कल्पद्रुम।देव मेघश्याम।परब्रह्म ॥अभंग ज्ञानेश्र्वरी९/९७८-९८४॥


अभंग ज्ञानेश्र्वरीची भाषा सोपी आहे. भगवंत पार्थाला सांगताहेत कीं त्यांच्या अनुसंधानाने संकल्प विकल्प समूळ जाळून टाकले तर तो परमात्मरूपच होईल संकल्प विकल्प रहित मन निर्विकल्प समाधीसुख अनुभवते हे भक्ति मार्गातील वर्म भगवंतांनी स्वत: पार्थाला सांगितले. इथे मना विषयीं भगवंत, माऊली व स्वामींचे विचार जाणून घेऊया.

मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरुमामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ।॥९/३४।।मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरुमामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे”॥ १८/६५॥

गीतेच्या वरील दोन्ही श्र्लोकांत भगवंतांनी “मन्मना:भव, मद्भक्त: भव मद्याजी भव मामेवैष्यसि” (माम् एव एष्यसि- मलाच येऊन मिळशील)या वचनांची पुनरुक्ति केली आहे. तद्वतच विभूती योग गीता १०/२२ मधे इंन्द्रियांत मन ही माझी विभूती असे सांगितले. माऊली ज्ञानेश्र्वरीत सांगतात कीं “इंद्रियांआंतु अकरावेंमन तें मी जाणावेंभूतांमाजी स्वभावें। चेतना ते मी”॥पण हें अकरावें  इंद्रिय मन जे केवळ काल्पनिक असूनही बाकी दहा इंद्रियांवर (पांच कर्मेंद्रिय व पांच ज्ञानेंद्रिय)  सत्ता गाजवते. तें ताब्यांत ठेवण्याची विद्या, ज्ञान तत्वज्ञ संत जिज्ञासु साधकाला देतात स्वामी सांगतात:-

“ निरोगी निर्मळ असावें शरीर । जाण ते मंदिर देवाजीचे १॥

मन बुद्धि शुद्ध असों देई नित्य । तें पूजा-साहित्य देवाजीचें॥२॥

सर्वकाळ चित्त ठेवावें पवित्र।तें चि पूजा-पात्र देवाजीचे॥३॥ सोऽहं भावें जीव पूजी नारायणासांडूनी मीपणा स्वामी म्हणे” ॥ ४॥संजीवनी गाथा १३६॥

स्वामी सांगतात अहं भाव त्यागून शरीराचे मंदिरातील नारायणाचे शुद्ध मन, बुद्धीपवित्र चित्ताने  सोऽहं भावे पूजन करावे. 

जीवाला अधिष्ठानरूप ब्रह्माचा विसर पडतोआपल्या आतच अमर्याद सुखाचा साठा असूनही ज्ञानवृत्ती बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करते. मग तिची धाव बाह्य विषयांकडे असते. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जीव विषयांचे ज्ञान करून घेतो कर्मेंद्रियांच्या सहाय्याने विषयांची प्राप्ती करून घेतो. विषय, देश वस्तु व कालाने मर्यादित असतो. त्या त्या विषयांपर्यंत ज्ञानवृत्ती पोचली की तिची धाव थांबते. तेथे ज्ञान विषयाचा आकार धारण करते. पूर्वी ज्ञात नसलेला विषय ज्ञात होतो. आत्मविस्मृतीतून जे ज्ञान उत्पन्न होते ते विपरीत ज्ञानच असते. अशा प्रकारे विषयाचे ज्ञान करून घेणार्‍या जीवाच्या ठिकाणी ज्ञातृत्वाची उभारणी होते व तो ज्ञाता  होतो. त्याला जो विषय कळतो ते ज्ञेय होते. ज्ञानाचा असा  व्यवहार होतो. ज्ञान ज्ञेय विषयाच्या हद्दीवर थांबते व पदार्थांना नावे देते. सामान्यपणे असे हे ज्ञाता, ज्ञानज्ञेय यांचे स्वरूप आहे.

आत्मविस्मृती झाल्यामुळे अज्ञानातून या त्रिपुटीचा जन्मआत्मज्ञान झाले की हा त्रिपुटीचा डोलारा कोसळून पडतो

‘अभंग ज्ञानेश्र्वरी’त लिहिलं आहे

“सर्व शरीरीं ह्या।वसे धनंजया। प्राणाची जी प्रियाक्रियाशक्तितिचें ह्या च पांचइंद्रियांच्या द्वारा।होत असे वीरा ।येणेजाणेंसांगितलीं ऐसीं। इंद्रियें दहा हि।आतां 'मन' तें हि। स्पष्ट सांगूं॥ इंद्रियां- बुद्धीच्यासंधींत जें फिरेरजोगुणाधारेंचंचलत्वेंमृगजळावरीभासती लहरी। नातरी अंबरींनील-वर्ण ॥तैसा देहीं भासेजयाचा आभासनाहींजयास‘वास्तवता’॥ रज आणि रेत । होवोनियां एक ।पंचभूतात्मक।देह घडे मग वायु तत्त्वएक चि तें देहीं‘दशविध’ होई । स्थान-भेदे देह -धर्म बळें ।मग ते दहा हि।आपुलाल्या ठायीं‘निवसतां’॥तेथ चांचल्य तें। एकलें चि राही । म्हणोनियां घेई । 'रजोबळ’बुद्धीच्या बाहेरीअहंकारावरीथोर बळ धरीमाझारीं च॥वायां तयालागींमन ऐसे नांव।तें तों ‘सावयव’।कल्पना च॥ जयाचिया संगें।ब्रह्मालागी साच।आली नसती च।जीवदशा ॥ सर्व प्रकृतीचे। असे जे का मूळवासनेसी बळ । मिळे जेणें ॥अहंकारालागींद्यावयासी भर। राहे निरंतरतत्पर जें॥ वाढवी इच्छेतें।चढवी आशेतें। आधार जें देतें। भयालागीं ॥ जेणें चढे बळअविद्येलागोन। होय जन्म स्थानदैताचें जें ॥जे कां इंद्रियांसीलोटी  विषयांतरची मनोरथसवें मोडीसंकल्प-विकल्पेंअखंड ‘उदंड’करी घडामोड़। सृष्टीची जें ॥ जेणें बंद केलेंबुद्धीचे हि द्वारभ्रांतीचे कोठार। होय जें का॥ वायु-तत्त्वाचियाआंतील जे सार।तें चि गा साचारमन जाण ॥१३/१६४ ते १८४॥ 

असे हे वायुतत्वाचें सार रजोगुणी चंचल मन  बुद्धीचे दार बंद करून संकल्प-विकल्पां द्वारा इंद्रियांना क्षणिक विषय सुखांत ढकलतेमृगजळामागे धावत तडफडणारे जीव पाहून जगद्गुरु तुकोबा राय सांगतातउपकारासाठीं बोलो हे उपाय। येणेंविण काय आम्हा चाड।  बुडतां हे जन देखवेना डोळां।येतो कळवळा।म्हणवोनि ॥आणि शाश्र्वत सुखाचा, अनुसंधान मार्गाचा बोध करतात. स्वामी सांगतात ‘चालतां बोलतां अनुसंधान प्रयत्नें करोन असों द्यावें’ किंवा “चालतां बोलतां हिंडतां फिरतांलिहितां वाचितां खातां जेवितां ।नाना सुखदुःख- भोग भोगितांनिजात्मसत्ता आठवावी’॥स्वरूप पत्र मंजूषा ६३-६४॥

चालतां बोलतां हिंडतां फिरतां यावरून आठवण झाली, स्वामी अनुसंधाना बाबत चिरपरिचीत दृश्य विहीर वा नदीवरून डोक्या वर घडे घागरी एकावर एक रचून गप्पा करत पाणी आणणार्या स्रियांचे उदाहरण देत असत त्या चालता बोलतानाही  त्यांच्या घागरींना धक्का लागत नाही.  ‘नाना सुखदुःख-भोग भोगितांनिजात्मसत्ता आठवावी’ याचा अर्थ हा की जीव मात्रांच्या सर्व क्रियांचे अधिष्ठान परमात्मा आहे याचें भान जाणीव ठेवून वागणे.


‘सदा स्व-रूपानुसंधानहेचि भक्ति हेचि ज्ञानतेणें तुटोनि कर्म-बंधनपरम समाधान प्राप्त होय’॥स्व.प.मंजूषा ६४॥


शेवटी, स्वामींच्या शब्दांत त्यांना

‘उदारा जगदाधारा देई मज असा वरस्व-स्वरूपानुसंधानीं रमो चित्त निरंतर’ ॥१॥वरप्रार्थना॥

अशी प्रार्थना सद्गुरुं पाशी करून

त्यांच्या कृपेने स्फुरलेली ही शब्द सुमनें त्यांच्याच चरणीं समर्पण.


                          माधव रानडे