Friday, May 31, 2024

                                   स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय 

      अवघे हरिमय योगबळे     

(॥संजीवनी गाथा १२२/४॥)


माझ्या जन्मापूर्वींची ही गोष्ट. पण मला आठवतंय की आमचे आजोबा (माझ्या आईचे वडील) कै.वासुदेव अनंत उर्फ अण्णा देसाई यांनी जेंव्हा स्वामीनां मी तुम्हाला आमच्याकडे “अनंत निवास” त न्यायला आलोय. मोठ्या परिवारांत तुमची योग्य ती काळजी घेणं सोपं जाईल असे सांगितले. तेंव्हा मितभाषी स्वामींनी, थोडी शक्ती आली की पंधरा  दिवसांनी येतो असे सांगितले. अंशत: खरं, सत्य, व वरकरणी शारीरीक पण  अंतरीं प्रपंच पाशातून मुक्ती हे त्याचे कारण असावे असे स्वामींच्या अभंगां व त्यांच्या कृती वरून मला तरी वाटते.


प्रपंच-विटाळा पासुनी मोकळाझालो मी सोवळा आत्मरूपनाम रूप कुळ सांडोनी सकळ।झालो मी केवळआत्म-रूपभेद-भाव मळ गेला अमंगळ ।झालों मी निर्मळ आत्म-रूप।जळांत कमळ।तैसा उपाधींत। राहतों अलिप्त॥स्वामी म्हणे”॥संजीवनी गाथा ४३॥


आतां त्या अवधीतील त्यांची कृती पाहु 


स्वामींनी त्यांच्या वाट्याची सर्व संपत्ती बंधुंच्या नावें केली.आत्म-रूपाचे  सोवळें परिधान करून नाम रूप कुळ यांचा त्याग करून ते अयाचित वृत्तीने फेब्रु. १९३५ ते महासमाधी १५ अॅागस्ट १९७४ पर्यंत “अनंत निवास”क्षेत्रसंन्यासी होऊन राहीले. रामचंद्र विष्णु गोडबोले म्हणुन नाही. देसाई परिवार मोठा म्हणुन स्वामी लिहितात- “जळांत कमळ।तैसा उपाधींत। राहतों अलिप्तस्वामी म्हणे॥” 


“तरी जयांचिये चोखटे मानसीं।मी होऊनि असे क्षेत्रसंन्यासी। जयां निजेलियातें उपासी।वैराग्य गा॥ ॥ज्ञानेश्र्वरी ९/१८८॥ 

चोखटे मानसीं म्हणजे कर्म- संकल्प, कर्म-बंध, विरहित मनांत.


आता माऊलींच्या पुढील ओव्या पाहुया- 

आणि तयां करणेया आंतु । घडो तिहीं लोकां घातुपरी तेणें केला हे मातु । बोलों नये ”॥ज्ञानेश्र्वरी १८-४४८॥


अर्थात त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामुळे तिन्ही लोकांचा नाश का होईना पण तो त्या मुक्त पुरुषाने केला हे बोलणे व्यर्थ निरर्थक.


“अगा अंधारुचि देखावा तेजेंमग तो फेडी हें बोलिजे ।तैसें ज्ञानिया नाहीं दुजेंजें तो मारी ”॥ज्ञानेश्वरी १८-४४९॥


जसे सूर्याने अंधार पाहिला मग त्याचे तेज अंधाराचा नाश करील हे बोलणे इष्ट होईल का ? तसेच ज्ञानी भक्ताला एक परमात्मा सोडुन सर्वत्र दुसरे काही दिसतच नाही. 


म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी ।गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥ ज्ञानेश्वरी १८-४५०॥


अशा मुक्त पुरुषाची बुद्धि पाप-पुण्य आदि पासून अलिप्त असते. जशी नदी गंगेला मिळताच गंगारूप होते. पवित्र होते. 


अमृतधारेच्या पुढील साक्या स्वामींच्या जीवन्मुक्तावस्थेचं दर्शन घडवतात.


वार चोरटे करूं पाहती षड्रिपु वारंवार।परी तीक्ष्णतर माझ्या सोsहं तलवारीची धारझुंज कशाचें कौतुक साचें हें जीवन्मुक्ताचें।तो विश्वाचें मूळ जाणुनी ब्रह्मानंदें नाचे॥षड्रिपुंनो खवळतां कशाला।मजवरी वेळोवेळां। असें वेगळा या बाळांनो, खुशाल खेळा खिदळा॥नसांनसांतुनीं तें नाचे संतांचे अस्सल रक्त।जाण साजणी आजपासूनि आम्ही जीवन्मुक्त॥अमृत धारा ११७ ते ११९,१२३॥


ज्ञानी भक्त स्वत:कडे कर्तृत्व घेत नाही तो द्वैताद्वैतविवर्जित अशा त्याच्या अवस्थेमुळे परब्रह्माप्रमाणेच अकर्तृत्व स्वरूप साक्षी होतो.  


विस्तार भयास्तव स्वामींचेच साहित्य पाहुं


हरि-रूप ध्यातां हरि-नाम गातांहरि चि तत्वतां झालों आम्हीआत्म-रूप आतां आघवा संसार।ठेली येरझार एकसरां॥पावलों नैष्कर्म्य देहीं विदेहत्व 

डोळां पर-तत्व देखियेलें॥स्वामी म्हणे राहूं भक्ति-सुखीं लीनहरिसी अर्पून भोग-मोक्ष”॥संजीवनी गाथा २०॥


संजीवनी गाथा या स्वामींच्या २६१ अभंग संग्रहातील शीर्षकाचा स्वामींनीं निवडलेला क्र.१२२ हे नाथ संप्रदायाचे सार सर्वस्व आहे. माझा नाथ-संप्रदाय  अवघे हरिमय योगबळे याचि देही याचि डोळां साध्य करणें हा अंतिम टप्पा आहे हे गुरुकृपेनेच शक्य पण प्रयत्नसाध्य  आहे असेही स्वामी म्हणतात.


या संग्रहांत सुमारे २० अभंग हरि-रूप पर आहेत. आदिनाथ, नाथ संप्रदायाचे

प्रवर्तक आहेत भारतीय संस्कृतीच्या मूळ

वैदिक धारणांवर योग आधारित हा पंथ आत्मा-परमात्मा,जीव-शिव यांचा योग शाश्वत आहे हे मानतो. स्वामींचा अभंग


हरि-रूप जाण व्यापक संपूर्णगिळोनि त्रिगुण राहिलेंसे॥जयाचिया पोटीं सामावली सृष्टि नाना जीव कोटी असंख्यात ॥ शून्याचें।जें सार प्रकृति माहेर।अवीट अक्षर परात्पर॥व्याप्य- व्यापकता नुरे चि तत्वतांअवघी हरि-सत्ता स्वामी म्हणे”॥सं.गा. ८॥


अमृतधारा हे स्वामी स्वरूपानंद यांचे जणुं पारमार्थिक आत्मचरित्र तर त्यांचें निज-जीवन तत्वज्ञान हे संजीवनी गाथा  अभंग आणि स्वरूप-पत्र-मंजुषा पत्रें.


भक्ती(१)व नाम(२६१) यांच्या कोंदणात 

स्वामींनी सोsहं-भावाचा हीरा जडला.


भक्ताचे अंतरीं सांवळा श्रीहरी।सुखें वास करी सर्वकाळ॥म्हणोनी तयासी विश्र्व हरि-रूप झालें आपेंआप अखंडित॥हरि-रूप काया हरि-रूप मायाहरि-रूप जाया पुत्र वित्त॥ हरि-रूप कर्म हरि-रूप धर्मभक्तीचें हें वर्म स्वामी म्हणे॥संजीवनी गाथा॥१॥


सर्वच हरि-रूप मात्र पहिल्या ओळीत हरि-हरां भेद नाही हे स्पष्ट करण्यासाठीं 

स्वामीनी भक्ताचे अंतरीं सांवळा श्रीहरी असे लिहिले सं.गाथेच्या मंगलाचरणात

गुरुपरंपरे पुढील ७ व्याओळींत स्वामी लिहितात:- योग-सार ऐसें परंपराप्राप्त ।सद्गुरू गणनाथ देई मज”॥स्वामींनी संजीवनी गाथेतील संक्षिप्त हरिपाठ म्हणून ज्या रचनांची निवड केली त्यात क्र. २७ वर मंगलाचरण व अभंग १२२ 

क्र. २८ वर आहेत. अशी अर्थपूर्ण निवड

स्वामीं सारखे सत्कवीवर तवज्ञ संतच करुं जाणोत. संपूर्ण अभंग असा आहे:-


कृपावंत थोर सद्गुरू उदार।तेणें योग-सार दिलें मज॥मन-पवनाची 

दाखवोनी वाटगगनाशीं गांठ बांधियेली॥शून्य नि:शून्याचें बीज महा -शून्यभेटविलें धन्य हरि-रूप॥स्वामी म्हणे माझा नाथ-संप्रदायअवघें हरिमय योग-बळें॥१२२॥


“सर्वं खल्विदं ब्रह्म” वा अवघे हरिमय योग-बळें हा स्वामींचा स्वानुभव आहे हे या लेखांतील रचनांच्या शब्दाशब्दांतून सूज्ञ वाचकांनां  स्पष्ट होईल.


चैतन्यरूप सोsहं-हंसावतार स्वामी स्वरूपानंद (पावस) यांच्या प्रेरणेतून स्फुरलेली शब्दसुमनें कालाष्टमीच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या चरणीं समर्पण



माधव रानडे        ३० मे २०२४