The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Tuesday, April 14, 2020

देव-भक्त असें द्वैत अद्वयत्व न खंडिता। दाखवी देव-देवेशा, प्रार्थना ही तुला अतां

               “ सोऽहं-हंसोपनिषद ”
                             अर्थात 
                श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) 
                     यांच्या साहित्यातील
                       ( चाकोरीबाहेरचे )
                   मराठीतील पहिले उपनिषद
                         ( क्रमश :-२५ )
         “ देव-भक्त असें द्वैत अद्वयत्व खंडिता
       दाखवी देव-देवेशा, प्रार्थना ही तुला अतां ”॥८॥ वर-प्रार्थना

श्री स्वामींच्या साहित्याचे ढोबळ वर्गीकरण केलं तर त्यातील भाग (१) 
अनुग्रहपूर्व-गद्य-एक नाटक व बाकी पत्रे (२) अनुग्रहोत्तर-गद्य पत्रे पद्य-
नवरत्नहार, ‘ज्ञानेश्वरी नित्य-पाठ’ (संकलित) ‘मृत्यु-पत्र’[अप्र.] (३) 
स्वरूप-साक्षात्कारोत्तर-परतत्वस्पर्शित पद्य- स्वानुभवान्तस्फूर्त  
स्वतंत्र अनुवादित अशी काही वैशिष्ट्ये संक्षेपाने सांगता येतील. 

तत्व-ज्ञानाचे विद्यार्थी, अभ्यासक, विचारवंत यांना, श्री स्वामींच्या स्वानुभवान्तस्फूर्त नवरसपूर्ण स्वतंत्र काव्याचा सांगोपांग अभ्यास व 
लेखनासाठी एक वेगळा दृष्टिकोन देणे हा या लेखमालेचा हेतु आहे.

श्रीमद्भगवद्गीतेवरील माऊलींचं प्राकृतातील निरुपण ही अजरामर व 
क्रांतिकारी साहित्यकृती आहे. तद्वतच श्रीस्वामी स्वरूपानंद यांचे स्वरूप-
साक्षात्कारोत्तर, नवरसपूर्ण आध्यात्मिक  प्रवास वर्णन, म्हणजे
 “ सोऽहं-हंसोपनिषद ”. त्यांच्या निढळावर जगन्मातेने लावलेल्या
आत्म-स्मृतीच्या तीटेचा प्रकाश पुढच्या पिढ्यांतील मराठी साधक व 
वाचकांचा मार्ग उजळून दीपस्तंभाचं काम करील. स्वामींच्या साहित्याला
 जगदंबेचे वरदानसत्याचं अधिष्ठान आहे
परिणामस्वरूप त्यांच्या छोट्या रचनाही परिपूर्णस्वयंपूर्ण आहेत.

त्यापैकी वर-प्रार्थना म्हणजे सार सूत्रण. वरील लेखमालेचा उपक्रम २१ जुलै
 १७ ला, सुरु केला तेंव्हा संकल्पित “सोऽहं-हंसोपनिषदा”  चा शांतिपाठ 
म्हणून घेतले.

“ नर-नारी हरीरूप दिसो बाहेर-अंतरीं।रामकृष्ण हरि मंत्र उच्चारो  मम
 वैखरी ” हे कडवे.  नाथ संप्रदायी सिद्ध योगबळा मुळे अवघे हरिमय 
 पहाण्याच्या आत्मरूप दृष्टिपरिणित होतो राम कृष्ण हरिया 
 सांप्रदायिक मंत्रा चा स्पष्ट उल्लेख आहे म्हणून निवडलं.

उपसंहारासाठी देव-भक्त असें द्वैत अद्वयत्व खंडितादाखवी 
 देव-देवेशा, प्रार्थना ही तुला अतां ”॥८॥वर-प्रार्थनाची निवड केली 
आहे कारण वरकरणी विरोधी वाटणाऱ्या ह्या शब्दांत माऊलीं पासून चालत 
आलेल्या द्वैताद्वैतविलक्षण भक्तियोगाचं दर्शन घडतं. आणि 
हे अपूर्व लीला-लाघव स्वामींनी अपरोक्ष अनुभविले (अ.धा.१५६

छांदोग्य उपनिषदातील दहराकाश भूमिकेवर आधारित ही भक्ति आहे.  
आदि शंकराचार्यांनी हीच दृष्टी विवेकचूडामणि नावाच्या ग्रंथात 
 स्व-स्वरुपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयतेविधानाने स्पष्ट केली आहे 
 अद्वैत वेदान्त चा पुरस्कार करणारा, वेदांचं सार हा ग्रंथ त्यांनी इ.स.७९५
 च्या आसपास लिहिला. त्यानंतरच्या अद्वैत-वादी संत कवींच्या साहित्यात
,आद्य कवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर माऊली समर्थ रामदास याचा प्रभाव 
दिसून येतो. लिहिले आहे -

सदा स्वरूपानुसंधान ।हे  मुख्य साधूचे लक्षण । जनी असोन 
 आपणजनावेगळा ।।” दासबोध : ०८/०९/०९ ॥

नाम, रूप, प्रपंच यांचा त्याग केलेल्या, अनासक्त, भेद-भाव रहित 
श्रीस्वामी स्वरुपानंद यांच्यांत ही सर्व सिद्धलक्षणं ठळकपणे दिसत ते  
सदैव आत्मरूपाशी समरस असत. अशा एकरूपतेमुळे समाज 
उपयोगी कामात व्यस्त असूनही ते या सर्वांपासून अलिप्त होते.

“ प्रपंच-विटाळापासुनी मोकळा।झालों मी सोवळा आत्म-रूप॥ 
नाम रूप कुळ सांडोनी सकळ।झालों मी केवळ आत्म-रूप
भेद-भाव मळ गेला अमंगळ।झालों मी निर्मळ आत्म-रूप॥जळांत 
कमळ तैसा उपाधींत।राहतो अलिप्त स्वामी म्हणे ”॥सं.गा.४३॥

स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर ’  असा वर जगदाधारा कडे 
मागण्याने “वर-प्रार्थने” ची सुरवात होते. माऊलीं प्रमाणेच स्वामींना  
अभिप्रेत असलेली भक्ती ही प्रेमलक्षणा ज्ञानभक्ती आहे.

“ एरव्हीं चौथी ना।तिजी हि अर्जुना।तेविं पहिली ना।शेवटली।।  
।।माझिया सहज-।स्थितीलागीं देख।म्हणों आम्ही एक।भक्ति ऐसें ”
।।अभंग ज्ञानेश्वरी १८/१९०७-१९०८।।

देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रांत वर्णन केल्याप्रमाणे ही भक्तीअस्मिन् 
 परमप्रेमरूपाअशी, सर्वस्पर्शी प्रेमाच्या निरंतर स्पंदनाचा अखंड  
अनुभव करणाऱ्या कोमल अंत:करणच्या स्वामींनी काव्यबद्ध केली.

“ ती इतस्तत: सर्वत: पहा संप्लुत चित्पुष्करिणी।आत्म-सुखाचा अखंड
 निर्झर वाहे अंत:करणी ”॥अ.धा.१३२॥ हाच साक्षात्कार.

स्वामींचे चरित्रकार वै.रा.य. यांचे सुपुत्र वै.गो.रा.परांजपे यांचे उत्स्फूर्त भजन
 “शुभ्र नेसणें।मधुर बोलणे।आशिर्वादा वरती हात। पांवसेचा हा स्वरुप
 नाथ॥” किंवा त्यांनीच लिहिलेल्या आरतीतील मधील सोहंहंसारुढ तुम्ही 
 सोडवाया भवबंधाहे स्वामींचे शब्द चित्र वाटते. अखंड गर्वहीन स्थिती 
 व विनय त्यांचा स्व-भाव होता.

श्री ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्या वाचतांनां मनांत येत राहातं कीं हे तर  
स्वामींचं वर्णन आहे. उदा. ज्ञाने. ७/१३३-१३६ या ओव्या पहा -

“ हें असो आणिक कांहीं।तया सर्वत्र मीवांचूनि नाही।- -” “ तैसा तो 
मजभीतरीं।मी तया आंतुबाहेरीं - -” “- - ।तो देखे ज्ञानाची वाखारी।
तेणें संसरलेनि करी।आपु विश्व॥” “ हे समस्तही श्रीवासुदेवो- ।म्हणोनि
 भक्तांमाजी रावो।आणि ज्ञानिया तोचि॥”

ज्ञानी भक्त हाच खरा भक्त आणि सहज स्थिती म्हणजे भक्ति हे एकदां
मनोमन पटलं की याबद्दलचे अवडंबर आपोआप दूर होतं.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” ही उक्ति त्यांच्या बाबतीत खरी आहे. 
 ‘बाल्यापासुनी गीताध्ययनी’असलेल्या स्वामींच्या छंदाचं रूप आणि 
 अभिव्यक्ती साधनेच्या विविध टप्प्यांवर बदलत गेली. कधी ‘राम कृष्ण 
हरि गोविंद’ तर कधी ‘आता मज एक विठ्ठलाचा छंद’  अशी फळत 
फुलत लागलासे छंद स्वरूपाचा या अवीट आनंदात स्थिरावली.  
                            
‘अज्ञानात् तिमिरं सर्वं, ज्ञानं प्रकाश वर्धते...आपल्या मनावर खोट्या 
मी ” पणाचं अज्ञानाचं/अविद्येचं मळभ दाटून आल्याने ज्ञान झाकतं.

सर्वांतर्गत असलेल्या स्फुरणरूपी मीच्या शोधात स्वरूपाचा-बोध कसा 
होतो ते स्वामींनी स्वत:च्याच उदाहरणाने दाखवले. सिद्ध केले.

“ मन-पवनाचा धरोनि हात।प्रवेश करितां गगनांत।आकळे आत्मा
 सर्वगत।येई प्रचीत आपणाते॥सोsहं म्हणजे आत्मा तो मी।शुद्ध बुद्ध
 नित्य स्वामी।अलिप्त; न गवसे रूप नामीं।बाणला रोमरोमीं भाव 
ऐसा॥गगन लंघोनियां जावें।अखंड आत्मरूपीं रहावे।विश्व आघवें 
विसरावें।स्वयेंचि व्हावें विश्वरूप॥ऐसा नाथपंथींचा संकेत।
दाविती सद्गुरु कृपावंत।मस्तकीं ठेवोनि वरद-हस्त।अभय देती 
मजलागीं॥४५/७-८-९-१०॥स्वरूप पत्र मंजूषा॥

“ आपुला आपण घेतां शोध।अंतरीं होतसे प्रबोध। मावळोनि द्वैत भेद
।अखंड आनंद लाभे जीवा॥आपण आपणां पाहों जातां।’मी देह वाटे
सर्वथा।परी देहाची मायिक वार्ता। आपण तत्वतां आत्मरूप॥”॥५०/५
-६॥स्वरूप पत्र मंजूषा॥

ध्यान करतांनां अनुसंधान करणं/ठेवणं एकवेळ प्रयत्नांती जमूं शकेल कारण
ध्यात्याचं तेंच ध्येय असतं पण दैनंदिन व्यवहारांतही तसं करणं शक्य आहे 
या गोष्टीवर “ नाना सुखदु:ख भोग भोगितां ।निजात्मसत्ता आठवावी॥
स्व.प.मं ६४/४॥ सांगून स्वामींनी भर दिला आहे. 

सध्या विश्व कोरोनाच्या विषाणूंचा/मनुष्यमात्र, कोविद १९ चा सामना 
करत असतांना मानसिक संतुलन/संयम ठेवण्यासाठी हे नितांत 
आवश्यक आहे. विपत्तीचा सामना कसा करावा याबाबत स्वामींनी एका 
साधकाला १९५४ साली लिहिलेलं त्यांच्याच हस्ताक्षरांतील विस्तृत पत्र हे
कालातीत मार्गदर्शन म्हणून दिलंय. 

आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर हा समारोपाचा लेख ब्लाॅगवर ठेवण्याची 
मनीषा सद्गुरुकृपेनें पूर्ण झाली.
श्रीराम श्रीसद्गुरु समर्थएकरूप जाणावे यथार्थअवतरले  
जगदुद्धरणार्थसाधका सत्पथ दावावया ” स्व.प.मं.