The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Friday, February 21, 2020


       “ सोऽहं-हंसोपनिषद ”
       अर्थात 
        श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) 
      यांच्या साहित्यातील
       ( चाकोरीबाहेरचे )
    मराठीतील पहिले उपनिषद
        ( क्रमश :-२३ )

 “ समर्थांसारिखे पूर्ण वैराग्य ज्याचें ।
ज्ञानदेवा परी ज्ञान योगेश्वराचें॥      
  ॥कवी तुकारामा सारिखा मान्य ऐसा।
          नमस्कार माझा तया गणेशदासा ”॥

क्र. २२ च्या लेखा अखेरीच्या वरील ओळीत, स्वामींच्या साहित्यातून त्यांच्या चरित्र व चारित्र्याचं
 प्रतिबिंबित होणारं शब्द-चित्रण आहे. 

परतत्वस्पर्शानं, अरूपातून स्वरूप-मय होऊन, भक्ति-सुधा-रसाचं विश्वासाठीं 
मुक्तहस्ते पारणं केलेल्या ऋषीची सत्यकथा आहे ही. 

आणि हे शक्य झालं, ते केवळ सद्गुरुनी सांगितल्याप्रमाणे भक्ति तितकी प्राप्ति” हे ब्रीद 
मानून नाम-रूप कुळ यांच्या अतीत गेल्याने.

श्रीस्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरीतील आत्म-रुप, स्वरूप प्राप्तीची सूत्रे, सोप्या मराठीत 
अभंगरुपात मांडली, ज्ञानभक्तीचा समन्वय केला. क्रम-योग‘सोऽहं’ ची ध्वनि-शक्ति
  स्पष्ट केली.

क्रम-योग म्हणजे वेगळे काहीच नसून भागवताच्या निमित्ताने भगवंतांनीं ब्रह्म्याला 
सांगितलेल्या भक्तीचा, क्रमा-क्रमानं अभ्यास 

नाभीपासूनि ब्रह्मरंध्रांतसोऽहं ध्वनि असे खेळततेथें साक्षेपें देऊनि चित्तरहावें 
 निवान्त घडिघडी ” ॥ स्व.प.मं ६३/१ ॥

स्वामी सांगतात या सहज चालणाऱ्या ध्वनिकडे, साक्षेपें म्हणजे लक्षपूर्वक, निवान्त चित्तानं 
ध्यान देणं. सुख-दु:खाकडे साक्षित्वानें (प्रारब्धवश देहभोग म्हणून) पाहाणं हाचअभ्यास.  

आत्मरूपीं दृढ विश्वासआत्माचि मी हा निदिध्याससाक्षित्वें साहोनि सुख-दु:खास
 करावा अभ्यास नित्यनेमें ”स्व.प.मं ६३/३ ॥
 “ सदा स्व-रूपानुसंधान हेचि भक्ति हेंचि ज्ञान ” स्व.प.मं ६४/७॥

असे केल्याने, तीच आद्य, स्वसंवेद्य स्पंदनें त्याच्या लहरी, हीच स्थूलातून सूक्ष्माकडे नेणारी 
 ध्वनि शक्ती सोऽहं” मंत्र होईल. 

तुजलागीं संप्रदायें करोन समंत्र सांगितलें सहज-साधन

सहज या शब्दाचा खुलासा जन्मना-सह असा आहे. मूल जन्माला आल्याचं लक्षण श्वास आहे.
 कोणत्याही व्यक्तिची श्वसनक्रिया निद्रेतही, ती जिवंत असेपर्यंत सहज,आपसुक व अखंड 
 सुरु असते. 

भक्तिची क्रमयोगाची पुष्टी करणारे " अभंग ज्ञानेश्वरी " तील “अभंग” पाहु

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्र्चास्मि तत्वतः
ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्।। गीता १८/५५ ||

ज्ञानभक्तीनें ह्या। भक्त जो स्वभावें।एकत्वासी पावे।
माझ्या ठायीं।।मी चि तो केवळ। होवोनिया राहे। ठावें तुज आहे। आघवें हें।। 
 ज्ञानी तो केवळ।आत्मा माझा जाण।बाहू उभारून ।
बोलिलों जें।।अभंग ज्ञानेश्वरी॥१८/१९३८ - १९४०।।
सहज ही भक्ति।माझी सर्वोत्तम।म्हणोनि परम।आवडीने ।।  
भागवतद्वाराकल्पारंभीं ही च।सांगितली साच।ब्रह्म्यालागीं।। 
'स्वसंवित्ती' ऐसें।ज्ञानी देती नांव।संबोधिती शैव।'शक्ति'ऐसें ।।
आम्ही तरी भक्ति।आपुली परम।ऐसें देऊं नाम।भक्तीसी या।। 
मद्रूपीं सायुज्यपावावया योग्य।होतसे सभाग्य।क्रम-योगी।।
तेंव्हां तयालागीं।ही च आपोआप।होय फलद्रूप।चौथी भक्ति।। 
तेणेंयोगें मग।विश्र्व हें सकळ।होतसे केवळ।मद्रूप चि।।
अभंग ज्ञानेश्वरी ॥१८/१९४२ ते १८/ १९४८।।
अवृत्तिसहित।वृत्ति बुडे तेथ।चौथी भक्ति प्राप्त।होतां माझी।।१९५०॥ऐसें मत्स्वरूप।पावोनि
तो योगी। एकत्वें चि भोगीमजलागीं ॥१९५४॥तैसा घडे भोग।भक्तीचिया योगें।
भक्त तो निजांगे।मी चि होता॥ 
आरशासी एका।दाखवितां जैसा।पुसोनि आरसा। दुजा एक ॥ 
द्रष्टेपणासी च।तेथें येई भर।तैसा चि प्रकार।जाण येथें॥
आपुलें एकत्व।असे जें स्वभावें।जैसें तें भोगावेंद्वैताविण
घडे चि भोगझालिया तन्मय।ऐसा अभिप्राय।जयांचा गा ॥ 
म्हणोनि मद्रूप।झाला नाहीं साच।तया लागी मी च।
आहें कोंठे?।।अभंग ज्ञानेश्वरी॥१८/१९५०-१९७१॥
मद्रूप होवोन।तैसा क्रम-योगी।पार्था, मातें भोगी।निरंतर॥१९७४॥
तैसा क्रियेविण।स्वभावें तो साच।भजे मातें मीच।होवोनियां॥ तैसी असे भक्ति।
स्वभावें अद्वैतीं।जरी साहे ना ती।क्रिया कांहीं
परी हें तों नये।दावितां बोलोन।स्वानुभवें खूण।कळो येतीं॥ 
असो ऐसा पूर्व-।संस्काराच्या छंदें।जें जें अनुवादें।क्रमयोगी ॥ तैसें स्थूल किंवा।
सूक्ष्म-नेत्रें पाहे।तें तें होत आहे।पाहतें च॥ 
ह्या परी दृष्यातें।सारोनि बाजूस।दावी पाहत्यास।देखणें तें।।ऐशापरी पार्था।दृष्यजात आटे।द्रष्टा जेंव्हा भेटे।
द्रष्ट्यासी च।।तेंव्हा उरे द्रष्टा।एकला म्हणोन।तेथें दृष्टेपण।
नुरे तें हि।।तैसा जो मी द्रष्टा।तो चि तो होवोन।दृष्याचें दर्शन।
घेऊं जाय।।तेव्हां दृष्यजात।स्वभावें लोपोन।प्रकाशितेपण।
तें हि लोपे॥तैसें दृष्यजात।होतां चि मद्रूप।लोपे आपोआप।
दृष्टत्व हि॥न पाहणें किंवा।पाहणें हि नाहीं।अवस्था जी कांहीं।
ऐसी होय॥दृश्यासवें आटे।जेथें द्रष्टेपण।तत्वतां 'दर्शन'।
तें चि माझे॥मज आत्म्यामाजीं।तैसा मिसळोन।मी चि मी होवोन।
राहिला तो॥तैसा कोंदला तो।क्रमयोगी देख।जो मी आत्मा एक।
तयानें गा।।तैसें सर्व कांहीं।मीच होतां तया।ठेलें धनंजया।
येणें जाणें।।तैसा क्रमयोगी।पावला तो मज।मद्रूप सहज।
होवोनिया।।२०२०।।म्हणोनियां केलें।तयानें जें कांहीं।न करणे होई।तयाचें तें।।२०३०
ऐशा रीती कर्म।आचरिलें जाय।न करणें होय।तत्वतां ते।।२०३३।।ती च महापूजा।
जाण कपिध्वजा।तेणें करी पूजा।नित्य माझी।।२०३४।।ऐशापरी तो जें।बोले ते स्तवन ।
देखे तें दर्शन।जाण माझें।।२०३५।।गमन तें साचें।मज अद्वयाचें ।अर्जुना तयाचें।चालणें जें।।
२०३६।।तो जें करी कांहीं।ती च माझी पूजा।कल्पी जें तो माझा।जप जाण।।२०३७।।
ज्या ज्या स्थितीमाजीं।असेल तो पार्था।समाधि-अवस्था।ती च माझी ।।२०३८।।तैसा स्वभावें 
 तो।भक्तियोगें ह्या च।एकरूप साच।माझ्या ठायीं।।२०४०।।तैसा क्रमयोगी।भक्त माझा जाण।राहे मिसळोन।माझ्या ठायीं।।२०४३।।ह्या चि स्वयंसिद्ध।भक्तियोगें पूर्ण।मद्रूप होवोन।निरंतर।।२०४४।।
आत्मत्वें तो पाहे।ज्ञानी-भक्त साच।मज द्रष्ट्यासी च।दृष्यजातीं।।२०४५।।

जागृत्यादि तिन्ही।अवस्थांच्या द्वारा।येई जें का वीरा।
प्रत्ययासी।।२०४६।।उपाधि आणिक।उपहिताकारें।दृश्य जें हें स्फुरे।भावाभाव।।
२०४७।।सर्व हि तें मी च।द्रष्ट ऐसें साचें।ज्ञान होतां नाचे।धेंडा जैसा।।२०४८।।
तैसें भावाभाव-।रूपें स्फुरे ज्ञेय।तें तें मी च होय।
ज्ञातेपणें।।२०५४।।ईश्य मी ईश्वर।अनादि अमर।अभय आधार।
आधेय मी।।२०५८।।स्वामी सदोदित।सहज मी सतत।सर्व सर्वातीत।सर्वव्यापी।।
२०५९।।स्थूल मी, मी सूक्ष्म।नवा मी पुराण।शून्य मी संपूर्ण।सर्वांपरी।।२०६०।।
मज एकालागीं।ऐसे आत्मपणें।अद्वय-भक्तीनें।
जाणोनियां।।२०६३।।ह्या हि बोधालागीं।जाणतें जे साच।असे तें हि मी च।ऐसे जाणे।।२०६४।।तेथ प्रकाशक।आणि प्रकाश्याचें ।दावीं ऐक्य साचें।तो चि जैसा।।२०६८।।तैसे लोपतांच।ज्ञेय तें सकळ।उरे जो केवळ।ज्ञाता एक।।२०६९।।ती च ज्ञानकला। ईश्वर मी होय।ऐसा चि प्रत्यय।असे ज्याचा।।२०७१।।मी च  आत्मा एक।द्वैताद्वैतातीत।अर्जुना निभ्रांत।जाणोनि हें।।२०७२।।
जाणणें जें तें हि।स्वानुभवें मुरे।ऐसी जेव्हां नुरे।ज्ञानोर्मि हि ॥ २०७३।।तैसा मी ईश्वर
।आणिक तो भक्त।पार्था ऐसे द्वैत।असे जें का।।२०७९।।स्वानंदानुभवीं।जिरोनि तें
 जातां।मद्रूप सर्वथा। होय तो हि॥२०८०॥जेथे 'तो' हा शब्द।संपे ऐशा परी।तेथें  
'मी' हा तरी।शब्द कोणा।।२०८१।।मग मी तो ऐसी।भाषा नुरे कांहीं।ऐशा माझ्या 
ठायीं।सामावे तो ॥ ।।२०८२।।जाणीवनेणीव।सांडोनियां सर्व।घ्यावा अनुभव।तयांचा
 गा।।२०९०।।स्वरूपीं त्या बोध। बोधेंचि जाणावा। आनंद लुटावा।आनंदें चि।।
२०९१।।स्वरूपीं त्या पार्था।।केवळ अव्यंग।सुखें घ्यावा भोग।सुखाचा चि।। २०९२।।बहु बोलूं काय।।क्रम-योग-वेली।सेवोनियां भली।
ऐशा रीती।।२०९६।।क्रमयोग-राज-मुकुटींचें रत्न।ऐसें जें मी ज्ञान।धनंजया।।२०९८।।क्रमयोगी तो हि।तें चि होय जाण।मज समर्पून।जीवदशा।।२०९९।।किंवा क्रमयोग- रूपी मंदिराचाकळस मोक्षाचा।असे जो हा।।२१००।।त्या चि मोक्षरूपी।कळसावरील।झाला तो विशाल।अवकाश।।२१०१
किंवा भवारण्यीं।क्रमयोग-मार्ग।जोडला तो चांग।धनंजया ॥ ।।२१०२।।क्रमोनि तो 
ज्ञानी।क्रमयोगी भक्त । ।मदैक्यग्रामांत ।प्रवेशला।।२१०३।।किंवा भक्तिज्ञान-।
रूपी गंगाजळ।ऐसा तो निर्मळ।क्रमयोगी।।२१०४।।स्वानंदोदधीस।मज मिळे वेगें। क्रमयोग-ओघें।निःसंदेह।।२१०५॥क्रमयोगाची ही।एवढी अपार । ।थोरवी साचार।असे पार्था।।२१०६।।म्हणोनिया आम्हीं।तुज वेळोवेळां।हा चि एक भला ।ऐकविला।।२१०७।।म्हणोनिया  पार्था।सांयासावाचोन।होय माझे ज्ञान।क्रमयोगें।।२११०।।
एक गुरु होय।आणि एक शिष्य।ऐसा सांप्रदाय।रूढ जो का।।२१११।।पाहें 

धनंजया।केवळ तो येथ।मत्प्राप्तीची रीत।
जाणावया।।२११२।।असो फलप्राप्ति।सांगोनि अंतिम।ऐसा उपक्रम।साधनाचा।।२११६।।
करिती कां देव।मागुती सखोल।ऐसें विचाराल।तरी सांगू।।२११७।।आत्मदर्शनाच्या।आड तैसा मळ।असे जो केवळ ।अविद्येचा।।२१२२।।
अविद्येचा नाश।मुख्य हा विषय।जेणें प्राप्त होय।
मोक्ष-फळ।।२१४०।।ह्या दोघां केवळ।ज्ञान चि साधन।सिद्धांत महान।हा चि एक।।२१४१।।नाना परी ग्रंथीं।देव नारायण।विस्तारें करोन।बोलिला जो।।२१४२।।


सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी आनंदी जीवनाची सूत्रे क्रमा-क्रमाने छोट्या रचनांमधून 
अचूकपणे मांडतांना माऊलींचा आदर्श ठेवला. 

स्वामींनी स्वानुभवाला शब्दरूप देत, केवळ नऊ ओव्यांत नवरत्नहार आणि फक्त आठ
 साक्यांमध्ये "वरप्रार्थनेतून" क्रमयोगाची सूत्रें मांडली. मितुलेरसाळ बोलाचा  
अमृतासमान वस्तुपाठ वाचकां/भक्तांसमोर ठेवला.

तद्वत नाथसंप्रदायाचे थोर वारसदार सदगुरु श्रीस्वामी स्वरुपानंद यांनी संकलित केलेला 
 " ज्ञानेश्वरी नित्यपाठ" ही माऊलींच्या भावार्थ दीपिकेची १०८ ओव्यांची जपमाळ 
तर १०९ वी ओवी त्या जपमाळेचा मेरुमणी आहे. 
आदिनाथ सिद्ध आदिगुरू थोर ज्यांच्याकडून शिव-शक्ति बीज नाथसंप्रदायाला  
प्राप्त झालं त्यांच्या/महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सदगुरुंच्या चरणी अर्पण


ranadesuresh@gmail.com       माधव रानडे
                                             

The links to the YouTube videos and blog on the life, literature, & philosophy of Swami Swaroopanand (Pawas) produced/financed under the banner of 
“  Swaroop Production ” are - 

(1) The Art of Happy Living “ सुखी जीवनाची कला ”
          https://youtu.be/rXoNczKaaio 

(2) दृष्टि Vision
        https://youtu.be/MJuh4xx4Vus

(3) Blog Address -  
          www.swamimhane.blogspot.com