The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Saturday, December 15, 2018

       15 Dec 2018                           सोऽहं-हंसोपनिषद

                        अर्थात 

            श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) 

                यांच्या साहित्यातील

                 ( चाकोरीबाहेरचे )

            मराठीतील पहिले उपनिषद
                  ( क्रमश :-१३)


आपल्या सत्- स्वरूपाचे आकलन करून घेण्याची उत्कट जिज्ञासा उरी बाळगणाऱ्या व त्यासाठी गुरुपदिष्ट मार्गावर चालत ‘ याचि देहीं याचि डोळां ’ ब्रह्मपद प्राप्त करणाऱ्या सद्गुरू स्वामी स्वरुपानंद यांचं जीवन चरित्र कठोपनिषदमुण्डकोनिषद दोन्हीमधील खालील मूलभूत चिंतनाची, आठवण करुन देतात.


“ नायमात्मा प्रवचनेन लभ्य: न मेधया न बहुना श्रुतेन ।

यमेवैष वृणुते तेन लभ्य: तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम् ”॥ (कठोपनिषद १.२.२३ व मुंण्डक ३.२.३)


माझा उपनिषदांचा अभ्यास नाही, पण जी काही थोडी तोंडओळख आहे, त्यावरुन मला वाटतं की, श्रीस्वामींच्या साहित्यातून मला प्रतीत होत असलेल्या ज्या प्रस्तावित   सोऽहं-हंसोपनिषद या संकलनाचा मागोवा मी घेत आहे त्याचा आशय व भूमिका ही “मुंण्डक” उपनिषदाच्या सारखी व “सर्वं खल्विदं ब्रह्म ” बोधाप्रत नेणारी आहे.


अद्वयभक्तीमुळे द्वैताद्वैता पलिकडे गेलेल्या, आत्म-तृप्त स्वामींचा,एका सिद्धाचा, जीवनमुक्ताचा, सत्यदर्शनचा सोहळा त्यांत शब्दरुप झालेला आहे. सत्याचं दर्शन घडावे हेच जीवनाचें ध्येय. त्यात मन समर्पून, ध्येयांत  तन्मय झालेल्या सत्कवीचे, हे अंन्त:त्स्फूर्त बोल आहेत.


अमृतधारा” संग्रहात सत्य’ शब्द अनेक साक्यांत आला आहे, त्यांतील काही आपण इथे पाहू -


“ ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ प्रत्यय ऋषिवर्यांचा 

उपनिषद्मिषें करि दुंदुभिरव शाश्वत आत्मसुखाचा”।६४।

“ जरी सत्य अव्यक्त एक तें वाड्.मनोमतीपरतें ।व्यक्तांतून चि सदा होतसे तदाविष्कृति येथें ”॥७०॥

“ पूर्ण सत्य तें प्रसन्न-अन्त:स्फूर्तमात्र काव्यांत । वास्तव्य करी, व्यवहारीं न च तथैव इतिहासांत ”॥७२॥


“ जगीं जन्मुनी अभिनव-जीवन-सत्कविवर होईन

स्वानुभवान्त:स्फूर्त नवरसीं सत्य-काव्य निर्मीन ” ॥१॥


उपनिषदांद्वारे शाश्वत आत्मसुखाची गर्जना करणाऱ्या ऋषिवर्यांनी ब्रह्माचं स्वरुप लक्षण सांगितांना लिहिलंय की अनन्त, आणि ज्ञान-रूप, ब्रह्म हे अंतिम सत्य आहे. 

ते सत्य स्वामींनी त्यांच्या काव्यातून व्यक्त केलं आहे -  


मध्ययुगीन कालात ज्ञान आणि भक्ती यांत भेद कल्पिला गेला.वस्तुत: परमज्ञान व पराभक्ती या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत.परमप्रेमरूपा ज्ञानभक्ती व अपरोक्षानुभव स्वरूप परमज्ञान यांचा दर्जा एकच. स्वामी ठाम सांगतात


भक्त तोचि ज्ञानी ।ज्ञानी तो चि भक्त । जाणावा  सिद्धान्त । स्वामी म्हणे ॥ संजीवनी गाथा ॥४०/४ कारण   “ दोहींचा भावार्थ सारिखा तत्वतां । 

                 एक चि हरि-सत्ता सर्वां ठायीं ॥”  


मुण्डकोपनिषदामध्ये प्रामुख्याने प्रणवोपासना सांगितली आहे, तशी स्वामींच्या स्वतंत्र साहित्यांत ‘सोऽहं साधना’


स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने सकाम कर्मकांड व पुरोहिती संस्कृतीच्या काल्पनिक भीतीचें प्रस्थ माजलेले असतांनां ब्रह्मविद्येच्या अज्ञानाचं निराकरण करून समाजाला योग्य अध्यात्मिक प्रेरणा देणं स्वामींना आवश्यक वाटलं.

 

“ पुण्य-पातक स्वर्ग-नरक ह्या शुष्क कल्पना मात्र।भय दावुनि सत्पथा न्यावया प्रसृत जरी सर्वत्र ”॥अ.धा.८६॥ 


“ काय भय करी खरी उन्नति प्रेमळता किंवा ती।निर्णय दिधला आत्मकृतींनीं जगती प्रेमळ संतीं ”॥अ.धा.८७॥


“ ‘असतो मा सद् गमय’ उपनिषद्वाणी दर्षवि ऋषिची । निज-उन्नतिची स्वाभाविक जी वृत्ति जीवमात्राची”।७१॥


म्हणून व प्रत्येक जीवमात्राची आत्मज्ञानाची स्वाभाविक वृत्ति ध्यानांत ठेऊन श्रीस्वामींनी प्रेमानं व निजआचरणातून ‘सोऽहं’ च्या सहज साधनेची प्रेरणा सर्वांना दिली.


अखंड ‘सोऽहं-स्मरण’, आणि सततचा ‘सोऽहं-भाव’  हा 

सोऽहं-हंसोपनिषद ” चा आत्मा आहे, प्राण आहे. व श्रद्धा आणि शुचिर्भूति याशिवाय काही बंधने नसल्याने नवीन पिढीतील कोणालाही आचरण्यास सरळ व सोपा.  सोऽहं साधने संबंधीच्या गैरसमजांमुळे भ्रांतचित्त झालेल्या साधकांच्या मनातील शंका दूर करणें याचा उद्देश आहे. 


श्री स्वामींसारख्या ज्ञानीभक्तांचे आत्मानंदमग्न लौकिक बाह्यजीवन, आणि त्यांच्या साक्या व अभंगांतून प्रतीत होणारी अंतर्यामी चालणारी परमात्म्याची आत्म-क्रीडा- 


   “ विनावैखरी होत अंतरीं सोऽहं शब्दोच्चार । 

 सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैतीं व्यापार ”।१४९।

       “ नाम रूप कुळ सांडोनी सकळ । 

          झालों मी केवळ आत्मरूप ॥

           भेद-भाव मळ गेला अमंगळ ।

      झालों मी निर्मळ आत्मरूप ” ॥सं.गा. ४३/२-३॥


“मुण्डका” तील पुढील श्लोकांची आठवण करून देतात-


आत्मक्रीड आत्मरति: क्रियावानेष ब्रह्मविदां वरिष्ठ: ”


“ यथा नद्या: स्यन्दमाना: समुद्रेऽस्तं गच्छन्ति नामरूपे 

       विहाय।तथा विद्वान् नामरूपाद्विमुक्त: 

            परात्परं पुरषमुपैति दिव्यम् ”

           मुण्डकोपनिषद - (३.१.४) व (३.२.८)


 तारखेनं आज श्रीस्वामींचा जन्मोत्सव त्या निमित्ताने 

सोऽहं-हंसोपनिषद वरील चिंतन-मनन-लेखन परत सुरु करण्याच्या अंत:प्रेरणेतून उमललेली ही शब्दसुमनं सद्गुरूचरणी सर्वभावे समर्पित.

               ॐ रामकृष्ण हरि ”


                                               माधव रानडे.