Sunday, December 24, 2017

सोऽहं-हंसोपनिषद
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- )
तुझा जयजयकार गुरुदेवा नित्य करिसी तूं सत्य सुखोदय
मी ब्रह्म ऐसा सोऽहंभाव जीवा भोगविसी देवा श्रीगुरो तूं अभंग ज्ञानेश्वरी 14/1-2 
श्री स्वामींचे वरील शब्द माऊलींच्या ज्ञाने.च्या ओवीचे अभंगरूप आहे हे खरे. पण स्वामींचे सर्व स्वतंत्र साहित्य नीट वाचले की लक्षांत येते कीं तेसोऽहंभावाने ओतप्रोत आहे.शब्द वेगळे असले तरी त्या शब्दाशब्दातूनसोऽहंभाव ओसंडून वाहतो. त्यांच्या अभंगांतील पुढील कडवी पहा-


स्वामी म्हणे झालों मी चि चराचर
नांदतो साचार एकला चि
देह  नव्हे ऐसा केलो गुरु-रायें  
देखिली म्यां सोये स्वरुपाची
आतां आत्म-रुप झालें त्रि-भुवन
हारपलें भान दिक्कालाचें
                                     संजीवनीगाथा. -१८६/,२५९/-


आतां अभंग ज्ञाने. तील सुरूवातीला दिलेला पुढील अभंग पहा.


शुद्ध आत्मज्ञान होतां चि जो सर्व देखतसे विश्व स्व-रुपीं
तया असो पार्था रुप आणि नाम सदेह तो ब्रह्म मानूं आम्हीं



श्रीस्वामींचे वैशिष्टय म्हणजे अहंकाराचा लोप कसा करायचा हे फार सोप्या शब्दात त्यांच्या अभंगांतून पत्रांतून समजावतात.


सोsहं साधने मधे जसजशी प्रगती होते तस तशी साधना अजपा चं रूप घेते.“विनावैखरी होत अंतरीं सोsहंशब्दोच्चार" असा प्रत्यय येऊ लागतो आणि हळूहळू अहंकाराचा आपसुकच लोप होतो.


त्यासाठीं देह म्हणजेच मी अशी ठाम समजूत असणाऱ्यांना त्यातून बाहेर पडायचा सहजसुलभ सोऽहं साधनेचा मार्ग ते दाखवतात. उदा. पुढील पंक्ति पहा-


  तुझे देह भिन्न माझे देह भिन्न ऐसा हा अभिमान कासयासी
  चार हि देहांचा करोनि निरास उन्मनीपदास गांठीं बापा
   “ देहीं उदासीन असो माझें मन राहो सावधान अंतर्यामीं
 स्वामी म्हणे माझा जावो अहंकार होवो साक्षात्कार स्वरुपाचा
    स्वामी म्हणे गेला देह-अहंकार झाला साक्षात्कार स्वरुपाचा
म्हणतांमाझादेह मी तों नव्हे देह आहे निःसंदेह आत्मरुप
स्वामी म्हणे सोडीं सोडीं देहाहंता सुखें भोगी सत्ता सोऽहं-रुप
                         संजीवनीगाथा.107/133/219/242


गंमत म्हणजे याकरितां प्रपंच सोडा किंवा संन्यास घ्या असं ते अजिबात  सांगत नाहीत. किंबहुना प्रपंचात राहूनच त्यांत गुंततां, त्याची आसक्ती बाळगतां असं होऊ शकेल असा विश्वास ते उत्पन्न करतात. उदा.-


प्रपंचीं असावें उदास वर्तन आवरावें मन विवेकानें
सुखें वैराग्याचा करावा अभ्यास प्रपंचाचा त्रास मानूं नये
                                 
वाचणाऱ्याला सहाजिकच प्रश्न पडेल की प्रपंचांत राहून उदास वर्तन, वैराग्याचा अभ्यास तोही सुखानं. हे सगळं पटणारं हा केवळ शाब्दिक खेळ वाटतो. म्हणून स्वामी लगेचच वैराग्याची खूण सांगतात -
  “असो घरदार कुटुंब संसार नये त्याचा भार वाटों देवों
स्वामी म्हणे देहीं जावें गुंतून ही चि असे खूण ।वैराग्याची
                                         संजीवनीगाथा-203


अभंगाच्या ओळी स्वामींचा उपदेश मनांत रुजावा या हेतूनं पाठी पुढे दिल्या आहेत. कारण इतरत्रही ते हाच मुद्दा मनावर ठसवतात. उदा.-


  “ अंतरीं संतत करीं सोऽहं ध्यान जाई गुंतून संसारांत
   धन सुत दारा असूं दे पसारा नको देऊं थारा आसक्तीतें
   स्वामी म्हणे राहें देहीं उदासीन पाहें रात्रं-दिन आत्म-रुप॥                                     संजीवनीगाथा-150
या सर्व गोष्टी केवळ तार्किक, शाब्दिक नाहीत.तूं याचं प्रत्यक्ष प्रमाण पहा हे दाखवण्यासाठी श्री स्वामींनी मला १७ डिसें २०१७ रोजीं परत एकदा पेणला पाठवलं.
या आधीं १८ जून १९७९ ला पाठवलं होतं. त्या माझ्या पेण स्वामी अमलानंद यांच्या भेटीचा उद्देश,“योगी कथामृतया परमहंस योगानंद यांच्या लोकप्रिय पुस्तकात ज्याक्रियायोगचा उल्लेख येतो ती क्रिया सोऽहंएकच आहे हे माझ्या नजरेला आणणे हा होता. मी, “जेथे जातो तेथेया माझ्या पुस्तकांत,हा खुलासा केला आहे.
याआधीही अनेक वेळां मी माझ्या बोलण्यांतून क्वचित् लेखनांतून सांगितलं आहे की परमात्म्याला आपल्या बरोबर संवाद साधायचा असेल तर त्याचं माध्यम शब्दां-ऐवजी घटनांचं असतं. आपल्याला त्या समजल्या पाहिजेत, त्यांत डोकावतां आलं पाहिजे. पुस्तकासारख्या वाचतां आल्या पाहिजेत.चैतन्यरूप श्री स्वामीं बरोबरचा माझा संवाद हा अशा प्रकारचा असतो. त्या दिवशी पेणला उपस्थित स्वामी भक्तांनाही निरुपण सेवेत संगा-अभंग २०३ उलगडून सांगताना हेच परत सांगितलं.
प्रपंचात राहूनही त्यांत गुंततां, त्याची आसक्ती बाळगतां अध्यात्मांत किती प्रगती करता येते, याचा वस्तुपाठ म्हणजे वैकुं. मामांचा म्हणजेच, स्वामी अमलानंद यांचा प्रपंच परमार्थ. ३९ वर्षे सरकारी नौकरी तीन मुलगे, दोन मुली, सर्वात लहान १९४७ सालची. असं भरलं घर. १९४८ नंतरच्या मामांच्या रोज-निशा त्यांच्या पारमार्थिक वाटचालीची माहिती देतात. मामांनां, विठ्ठलराव जोशी यांचे मार्फत सप्टें.५२ मध्ये स्वामी स्वरुपानंद यांची मंत्रदीक्षा मिळाली तरी स्वामींची प्रत्यक्ष भेट १९६० मधे १९५९ साली झालेल्या एका दृष्टांतानंतर झाली.मधल्या काळांत त्यांनी सोऽहं साधना केली. सोऽहं भावाचा प्रत्यय यावा असं होतं ते स्वप्न.  
           
              ऐसा आनंदाचा कंद श्री स्वामी स्वरूपानंद
                स्वामी सगुण निर्गुण सर्वांघटीं राहे जाण  
            जाण बाळा मुख्य खूण सोऽहं भावें ब्रह्म पूर्ण
           ऐसा स्वामी बोध करी बाळ त्यासी नमस्कारी


या १४//५९ च्या स्वप्न-दृष्टांताचं कारण होतं मामांची सात वर्षांची  “सोऽहं भावपूर्ण सोऽहं साधना.मामांना जी आज्ञा मिळाली ती अशी-


         “ विचित्र स्वप्न देखिलें मच्छिंद्र नाथ बोलले
                  चौरंगीनाथ पाहिले।नाथ अमल संबोधिले  
              स्वामी भेटी अज्ञापिली ।नाथपंथी खूण दिली
          सिद्ध स्वामी रुपें आला नाही केला हो गल्बला
         सुखें ज्याचें त्याला देती सर्वां कल्याण इच्छिती


नाथ सिद्धांच्या आज्ञेप्रमाणे, स्वामींच्या अनुज्ञेने मामांनीं, पांवसला जाऊन, १७ जाने. १९६० ला त्यांचे,आपल्या सद्गुरूचें प्रत्यक्ष दर्शन घेतले
या भेटींत, स्वामींनीं मामांकडून, ज्ञाने.तील पुढील ओव्या वाचून घेतल्या


        “ हे शब्देविण संवादिजे इंद्रियां नेणतां भोगिजे
           बोलाआदि झोंबिजे प्रमेयासी ॥१/५८॥ज्ञानि/१०२॥
           जें अपेक्षिजे विरक्तीं ।सदा अनुभविजे संतीं
           सोऽहंभावें पारंगतीं ।रमिजे जेथ ॥१/५३॥ज्ञानि/१०३॥
आधीच्या लेखांत लिहिल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली गीता तत्वज्ञानातीलसोऽहंभावाचा एक नवीन दृष्टीकोन देते, हा उल्लेख प्रास्ताविकांच्या ओव्यांत येतो. श्रीस्वामींच्या नित्यपाठ संकलनांतील, ओव्यांचा बदलेला क्रम ओव्या वाचून झाल्यावर स्वामी मामांना म्हणाले ते ध्यानात घ्यावे-  
याचा अनुभव शब्दांनी येणारा नाही. मन, बुद्धी ह्यांच्या पलीकडील असे जे मोक्षसुख तेसोऽहंभावानेच प्राप्त होणार. ‘सोऽहं : अहम्, : अहम्तो मी आहे,तो मी आहे, अशी दृढ श्रद्धा ठेवून देहबुद्धी च्या कचाट्यातून सुटून आत्मबुद्धी झाली की मगच त्याचा अनुभव येणार.”
श्री स्वामींच्या या शब्दांवर अंमल करीत, एकलव्यासारखी भक्ती करत असलेल्या मामांना, स्वामींनी २०/०९/१९७० च्या पत्रात, १२/०९/१९७१ रोजी दिलेल्याअमृतधाराया प्रसादभेट म्हणून दिलेल्या पुस्तकावर, “अमलानंदअसे संबोधित करत वीसाव्या शतकांतील नाथसंप्रदायाच्या या वारसदारानं मामांना मिळालेल्या नाथपंथी खूणेचं शिक्कामोर्तब केलं मामांचे तीनही चिरंजीव स्वर्गवासी झाले. पण त्यांची नातवंड मुली हा वारसा ज्या भक्तिभावानं पुढे नेत आहेत ते पाहून मामांच्यासोऽहंभावाची बीजं किती खोलवर आहेत याचा प्रत्यय १७ डिंसे. ला आला.


       “ मायिक नश्वर विषयसुखास्तव माजविले बडिवारें
        आत्म-देव अव्हेरुनि आम्ही देहाचे देव्हारे ॥अ.धा.८८॥”  
श्रीस्वामींचे वरील शब्द, त्यांच्या साहित्यांतून प्रकट होणारे त्यांचे निज जीवन तत्वज्ञान, (“देहबुद्धी च्या कचाट्यातून सुटून आत्मबुद्धी झाली की मगच त्याचा {सोऽहं भावाचा} अनुभव येणार”) एका नवीन शाश्त्रीय समीकरणाची मांडणी करत आहे असं वारंवार मनांत येतं.


मी = ME = यांतील M = Matter = देह = देहबुद्धी,  E = Energy = उर्जा = आत्मतत्व = आत्मरूप = आत्मबुद्धी
Therefore (Matter+Energy) ME-(Minus) M = E = Energy =आत्मबुद्धी
सोऽहं-हंसावतार सद्गुरू श्री स्वामी स्वरुपानंद यांचे चरणीं शतशत प्रणाम.


ranadesuresh@gmail.com                                                             Madhav Ranade

Annexure Section